आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणा-या सालूमरादा यांचा समावेश आता बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांमध्ये झाला आहे. मुळच्या कर्नाटकच्या असलेल्या सालूमरादा या १०५ वर्षांच्या आहेत. आणि या यादीतील त्या सगळ्यात वृद्ध महिला आहेत.

वाचा : प्रतिदिन १५ रुपये कमावणारे सुदीप आज १६०० कोटींचे मालक

काही दिवसांपूर्वी बीबीसीकडून जगातील १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहिर करण्यात आली. या यादीत कर्नाटकच्या सालूमरादा थिम्मका यांचाही सहभाग करण्यात आला आहे. थिम्मका या १०५ वर्षांच्या आहेत. या प्रभावशली महिलांच्या यादित व्यासायिक, राजकारणी, अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या अशा आघाडींच्या महिलांचा समावेश आहे. या महिलांच्या यादित सालूमरादा यांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. गेल्या ऐंशी वर्षांपासून त्या झाडे लावण्याचे काम करत आहे. आतापर्यंत त्यांनी ८ हजारांहूनही अधिक झाडे लावली आहेत. त्यातल्या काही झाडांचे रुपांतर तर महाकाय वृक्षांमध्ये झाले आहे. एक मोठं जंगल त्यांच्या प्रयत्नाने तयार झाले आहे. अनेक पक्षी, कीटक, प्राणी यांनी या जंगलात घर बनवले आहे.

वाचा : भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या

सालूमरादा यांना मूल नाही. लग्न झाल्यानंतर मूल होत नाही म्हणून सासरच्या मंडळींना त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली. टोमणे मारले या काळात त्यांच्या पतीने त्यांची साथ कधीच सोडली नाही. सासरच्या जाचाला कंटाळून सालूमरादा आणि त्यांचे पती घर सोडून निसर्गाच्या सानिध्यात राहायला गेले. तिथेच त्यांनी झाडे लावायला सुरूवात केली. एक एक करून त्यांनी आतापर्यंत ८ हजारांहूनही अधिक झाडे लावली आहे. ‘ही झाडे माझ्या मुलांसारखी असून मी, त्यांची मुलाप्रमाणे काळजी घेते’ असे सालूमरादा सांगतात.