‘फादर्स डे’च्या दिवशी मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. या दोन प्रतिस्पर्धी संघाची लढत पाहण्यासाठी मैदानावर हजारो चाहते जमले होते. स्टेडियमवर एक प्रेमी युगुल सामन्याचा आनंद लुटत होता. त्याचवेळी एका तरूणाने स्टेडियममध्येच तरूणीला प्रपोज केला. उपस्थित प्रेक्षकही त्यांच्या आनंदात सहभागी झाले.

नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यामॅनने जेव्हा स्टेडियमवर कॅमेरा फिरवला तेव्हा या तरुणाने आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं. अवघ्या स्टेडियमवर हा प्रेमळ क्षण स्टेडियमवर लावण्यात आलेल्या मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. जेव्हा तरुणीने तरुणाच्या प्रपोजला होकार दिला तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थितीत सर्वांना टाळ्यांचा कडकडाट केला. लग्नाचा हा प्रपोजचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

प्रपोजल स्वीकारल्यानंतर तरूण सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना ‘हाउज द जोश’ असे विचारतो. त्यावर उत्साहात प्रेक्षकही ‘हाय सर’ असे प्रतिउत्तर देतात. हा व्हिडीओ स्वत: त्या मुलीने ट्विट केला आहे. अन्विता असे तिचे नाव आहे.

अल्पावधीतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.