राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच ३ जून रोजी मराठा भाजपा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून राज्यातील ठाकरे सरकार आणि खासदार संभाजीराजेंवर टीका केली. “मराठा आरक्षण स्थगितीला ठाकरे सरकारच जबाबदार आहे. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. त्यामुळे मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे?, हे मला चांगलं माहिती आहे”, असं त्यांनी सांगितलं. शरद पवारांनी मराठा समाज आणि आरक्षणाच्या बाजूने बोलण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संभाजीराजेंवरही टीका केली. मात्र या टीकेच्या बातम्यांनंतर मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर एका वेगळ्याच कारणासाठी राणेंच्या या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लोकप्रिय मराठी मिम्स पेजने या राणेंच्या पत्रकार परिषदेमधील जीडीपीसंदर्भातील प्रश्नांचा व्हिडीओ एडीट करुन अपलोड केल्यानंतर तो व्हायरल झालाय.

नक्की घडलं काय?

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Vijaypat Singhania and his son Gautam Singhania
गौतम सिंघानिया आणि तुमच्यातला वाद मिटला?, विजयपत सिंघानिया म्हणाले, “इच्छा नसतानाही..”
arvind kejriwal arrets
केजरीवालांच्या ‘कट्टर भक्ता’चा देशात बोलबाला; एका व्हिडीओमुळे व्हायरल झालेले राम गुप्ता नेमके कोण?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पत्रकारांनी नकारात्मक जीडीपीसंदर्भात प्रश्न विचारला असता नारायण राणेंनी नाना पटोलेंमुळे भारताचा जीडीपी नकारात्मक असल्याचं उत्तर दिल्याने पत्रकारांचाही गोंधळ उडाला. पत्रकारांनी राणेंना प्रश्न नीट समजावून सांगितल्यानंतरही राणेंनी जीडीपी हा खर्च वाढल्याने कमी झाल्याचं उत्तर दिलं. झालं असं जीडीपी नकारात्मक आहे, बेरोजगारीचं प्रमाण रोज वाढत आहे, तरुण नैराश्येत चाललाय यासंदर्भात केंद्र सरकारचं काही धोरण आहे का?, असा प्रश्न सुरुवातीला राणेंना विचारण्यात आल्या. यावर उत्तर देताना राज्यात सतत लॉकडाउन लावला जात असल्याच्या मुद्दा उपस्थित करत राणेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आमचे मोदी साहेब तर सांगत आहेत की तुम्ही सतत लॉकडाउन लावू नका. बघा जगात काही देशांनी लॉकडाउन लावलाच नाही. माणसं मेली असतील थोडी फार इकडे तिकडे. पण त्यांनी लॉकडाउन न लावता आपली अर्थ व्यवस्था संभाळली. त्यांनी उद्योग सुरु ठेवले. आपण उद्योग, दुकाने बंद केले. बेकारी वाढवली. या राज्याचा आर्थिक तोटा फार होणार. एकही विकास काम होणार नाही, रस्ते नाही, पाणी नाही. काहीच होणार नाही. यावर मुख्यमंत्री बोलत नाहीत, असं उत्तर राणे यांनी दिलं.

नक्की वाचा >> ज्या प्रमाणात देशाचा GDP पडला त्याच प्रमाणात मोदींच्या दाढीचा आकार वाढला; व्हायरल ग्राफ पाहिलात का?

जीडीपीवरुन नाना पटोलेंवर निशाणा

भारताचे राष्ट्रीय सखल उत्पन्न म्हणजेच जीडीपी नकारात्कम गेलाय यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता नारायण राणेंनी, “कोणी केला यांनी, या नाना पटोलेंनी,” असं उत्तर दिल्यानंतर पत्रकारही गोंधळले. पत्रकारांनी जीडीपीसंदर्भातील प्रश्न होता असं राणेंना पुन्हा एकदा सांगितलं. तुम्हाला देशाच्या जीडीपीबद्दल प्रश्न विचारण्यात आलाय आणि तुम्ही राज्याच्या राजकारणावर उत्तर देताय, असं पत्रकाराने राणेंना सांगितलं. नंतर राणेंनी उत्तर देताना, “का कमी केला तर खर्च वाढला. मी सांगतो ना, इन्कम कमी झाला. अंदाजापेक्षा अधिक जास्त खर्च होतो,” असं राणेंनी म्हटलं. राणे जीडीपीबद्दल बोलत असताना त्यांच्या शेजारी बसलेली व्यक्ती सुद्धा या व्हिडीओमध्ये हसताना दिसत आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : GDP म्हणजे नेमकं काय? तो कसा मोजतात?, त्याचा सामान्याशी संबंध कसा?

पाहा राणेंच्या याच वक्तव्याचे व्हायरल झालेले काही ट्विट आणि व्हिडीओ…

१)

२)

३)

४)

५)

६)

राणे यांचा हा व्हिडीओ महाविकास आघाडीच्या समर्थकांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केलाय.