News Flash

VIDEO : भारताचा ‘मॅग्नेट मॅन’!

आपली ही शक्ती दिवसेंदिवस वृध्दींगत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी ५-५ किलोच्या दोन इस्त्री (आयर्न) आपल्या शरीराला चिकटवून चालत जाण्याचा कारनामा करून दाखविला.

मध्य प्रदेशातील अरुण रायकर यांना भारताचे ‘मॅग्नेट मॅन’ म्हणून ओळखले जाते. सागर जिल्ह्यात राहाणाऱ्या अरुण यांना आपल्यात काहीतरी अदभूत शक्ती असल्याची जाणीव झाली. आपल्या शरीरातील चुंबकीय शक्तीच्या जोरावर आपण कशाप्रकारे चमचे आणि खिळे शरीराला चिकटवू शकतो याचे दर्शन त्यांनी इतर लोकांनादेखील घडवले. आपली ही शक्ती दिवसेंदिवस वृध्दींगत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी त्यांनी ५-५ किलोच्या दोन इस्त्री (आयर्न) आपल्या शरीराला चिकटवून चालत जाण्याचा कारनामा करून दाखविला. आपल्या शरीरातून निघत असलेल्या खास तरंगांमुळे लोखंडी वस्तू आपल्या शरीराकडे आकर्षित होत असल्याचे अरुण यांचे म्हणणे आहे. एका व्हिडिओमध्ये उपस्थितांसमोर अंगाला दोन इस्त्री चिकटवून ते चालून दाखवताना दृष्टिस पडतात. यातील एका इस्त्रीचे वजन ५.२५ किलो तर दुसऱ्या इस्त्रीचे वजन ५.२६६ किलो इतके होते. याच व्हिडिओमध्ये ते अंगाला चमचे आणि लोखंडी खिळे चिकटवतानादेखील नजरेस पडतात. त्यांच्यातील ही अदभूत शक्ती दर्शविणाऱ्या एक व्हिडिओची मागणी ‘लिम्का बुक’तर्फे रायकर यांच्याकडे करण्यात आली आहे. आपल्या शरीरात संचारत असलेल्या या अदभूत शक्तीचा एक व्हिडिओ ‘गिनिज वर्ल्ड बुक’लादेखील पाठविला असल्याचे रायकर सांगतात. अद्याप गिनिजकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. लोखंडी आणि धातूच्या वस्तू आपल्या शरीराकडे आकर्षित होत असल्याचा दावा रायकर यांनी केला आहे. आपल्या शरिरातील छाती, कंबर आणि पोट या भागांमध्ये चुंबकीय शक्ती संचारत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दहा किलोच्या आसपास वजन असलेली कोणतीही लोखंडाची वस्तू आपल्या शरीराला चिकटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रायकर यांच्या शरीराला चिकटलेल्या वस्तू शरीराला घाम आला तरीदेखील खाली पडत नाहीत.

व्हिडिओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:05 am

Web Title: indian magnetic man who can attract 10kg iron to his body
Next Stories
1 Viral Video : अन् मेट्रोत सुरू झाला डान्स धमाका
2 ४० किलो चॉकलेट वापरून साकारला गणपती बाप्पा, दुधात करणार विसर्जन
3 जगातील सगळ्यात उंच ‘बुर्ज खलिफा’मध्ये एका भारतीयाचे २२ फ्लॅट
Just Now!
X