भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेचा वैमानिक म्हणून समावेश करण्यात आला आहे. शुभांगी स्वरूप असं या महिला वैमानिकाचं नाव आहे. शुभांगी यांच्यासोबत आस्था सहगल, रूपा ए. आणि शक्तिमाया एस. यांचाही समावेश नौदलात करण्यात आला आहे. नौदलात असलेली पुरूषांची मक्तेदारी या चौघींनी मोडून काढली आहे, म्हणून या चौघींचं विशेष कौतुक होत आहे. या चौघींवरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार असल्याचे समजत आहे. नौदलात चार महिलांची वैमानिक म्हणून भरती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

.. म्हणून त्रिपुरातील अनेक वृत्तपत्रांनी ‘अग्रलेख’ छापलाच नाही

शुभांगी स्वरूप इंडियन नेव्हल अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘ही खूप महत्त्वपूर्ण संधी आहे पण त्याचसोबत जबाबदारीचे काम असल्याचं शुभांगी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शुभांगी या मुळच्या उत्तर प्रदेशमधल्या बरेलीच्या आहेत. नौदलात महिलांना पायलट म्हणून घेण्यासाठी २०१५ मध्येच मंजुरी देण्यात आली होती. नौदलात मोठ्या पदापर्यंत पोहोचून या चौघींनीही इतर महिलांना प्रेरणा दिली आहे. महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केल्यानंतर या चौघींवर विशेष जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

जाणून घ्या अमेरिकेतल्या सर्वात आवडत्या ‘थँक्सगिव्हिंग’ सणाबदद्ल