करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला गेला नाही. भारतीय खेळाडूही या लॉकडाउनच्या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत अधिकाधीक वेळ घालवत आहेत. एरवी नेहमी मैदानावर असणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी ही एका अर्थाने सुवर्णसंधीच होती. सलामीवीर शिखर धवन आपली पत्नी आणि मुलांसह सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. मुलांसोबत डान्स, पत्नीसोबत बॉलिवूड गाण्यांवरचे डान्स करताना फोटो, व्हिडीओ शिखर नेहमी पोस्ट करत असतो.

लॉकडाउन काळात शिखच्या घरात दोन नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे. शिखरने दोन कुत्र्यांना दत्तक घेतलं असून त्यांच्यासोबतचा फोटो शिखरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिखरने आपल्या कुत्र्यांचं नाव क्लोई आणि व्हॅलेंटाईन असं ठेवलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिखरने आपला मुलगा झोरावरला सोबत घेऊन रस्त्यावर गाईंना जेवण दिलं होतं. प्रत्येक मुक्या प्राण्याचा जीव महत्वाचा असतो हे माझ्या मुलाला समजलं पाहिजे यासाठी आपण हे करत असल्याचं शिखर म्हणाला होता. आयपीएलमध्ये शिखर धवन दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रतिनिधीत्व करतो, मात्र यंदाची स्पर्धा बीसीसीआयने करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता स्थगित केली आहे.