News Flash

आलप्स पर्वतांमध्ये सापडली १९६६ ची भारतीय वृत्तपत्रं; मुखपृष्ठावर आहे इंदिरा गांधींबद्दलची बातमी

फ्रान्समधील आलप्स पर्वतांमध्ये सापडली भारतीय वृत्तपत्रं

(Source: AFP/File Photo)

भारतामध्ये १९६६ साली प्रकाशित झालेली काही वृत्तपत्र फ्रान्समधील आलप्स पर्वत रांगांमध्ये सापडली आहेत. माँट ब्लाँक ग्लेशियरच्या बर्फाखाली ही वृत्तपत्रं सापडली आहेत. ही वृत्तपत्र २४ जानेवारी १९६६ साली झालेल्या विमान अपघातादरम्यान येथे पडलं असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या विमान अपघातामध्ये विमानामधील सर्वच्या सर्व ११७ प्रवासी मृत्यूमुखी पडले होते. यापैकी एका वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पक्षाच्या प्रमुख म्हणून निवडण्यात आल्याचे वृत्त त्यांच्या फोटोसहीत छापल्याचे दिसत आहे. ही वृत्तपत्रे सापडल्याची बातमी बीबीसीने दिली आहे.

नॅशनल हेराल्ड, इकनॉमिक टाइम्स यासारखे जवळजवळ डझनभर वृत्तपत्र येथील एका हॉटेल मालकाला सापडले आहेत. १९६६ साली जानेवारी महिन्यामध्ये मुंबईहून न्यूयॉर्कला उड्डाण केलेले एअर इंडियाचे बोईंग ७०७ हे विमान माँट ब्लान्स इथे कोसळले होते. याच विमानामधील ही वृत्तपत्र असल्याचं अंदाज व्यक्त केला जात आहे. टिमोथी मॉटीन असं या मालकाचं नाव आहे.

नक्की वाचा >> “करोनाविरुद्धच्या युद्धासाठी भारताला ताकद मिळो!”; या देशाने संपूर्ण पर्वतावरच केली तिरंग्याची रोषणाई

ही वृत्तपत्रं टिमोथीला चामोनिक्स स्काय रिसॉर्ट परिसराच्या आजूबाजूला सापडल्याचे त्याने एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. “ही वृत्तपत्र सध्या मी सुकवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ती सर्व व्यवस्थित वाचता येण्याजोगी आहेत. त्यावरील अक्षरे स्पष्ट दिसत आहेत,” असं टिमोथी सांगतात. ही वृत्तपत्र सुकल्यानंतर ती आपण आपल्या हॉटेलमध्ये फ्रेम करुन लावणार आहे. विमान अपघाताच्या ठिकाणी सापडलेल्या गोष्टींचा संग्रह टिमोथी करतात त्यामध्ये आता या वृत्तपत्रांचीही भर पडली आहे.

(Source: AFP/File Photo)

२०१३ साली टिमोथी यांनी मैल्यवान रत्नांची एक पेटी सापडली होती. यामध्ये पन्ना, नीलम आणि माणिक अशी मैल्यवान रत्न होती. या रत्नांची किंमत ३ लाख डॉलरहून अधिक आहे. तापमानवाढीमुळे आल्पस पर्वत रांगांमधील बर्फ वितळत आहे. त्यामुळेच बर्फाखाली गाडल्या गेलेल्या अनेक वस्तू सापडत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:51 pm

Web Title: indian papers resurfacing in french alps could be from 1966 plane crash scsg 91
Next Stories
1 चक्क माणसासारखे ओठ आणि दात, कोणता आहे हा अनोखा मासा? तुफान व्हायरल होतोय फोटो
2 खरंच अमिताभ बच्चन आणि नानावटी रुग्णालयाचे आर्थिक हितसंबंध आहेत का?
3 उपचारासाठी गेला होता हॉस्पिटलमध्ये आणि नर्सच्या प्रेमात पडला, वाचा विल्यमसनची प्रेमकहाणी
Just Now!
X