19 April 2019

News Flash

भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा देताना भाजपा नेत्यांनी वापरला अमेरिकन युद्धनौकेचा फोटो

अमेरिकन युद्धनौकेचा फोटो वापरणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश

यांनी वापरला फ्रीडम प्रकारातील युद्धनौकेचा फोटो

भारतीय नौदल दिवस ४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच ट्विटवर #IndianNavyDay हा हॅटॅशग ट्रेण्ड होताना दिसत होता. सामान्यांबरोबरच अनेक बड्या नेत्यांनीही नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यापैकी अनेक नेत्यांनी भारतीयांना भारतीय नौदलचा अभिमान वाटतो असे सांगताना चक्क अमेरिकन नौदलातील युद्धनौकांचे फोटो ट्विट केले आहेत. ही चूक करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भाजपाच्या नेत्यांचा समावेश आहे. झालेली चूक नेटकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही या पोस्ट सोशल मिडियावरून डिलीट करण्यात आलेल्या नाहीत.

भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा देताना अमेरिकन युद्धनौकेचे फोटो ट्विट करणाऱ्या नेत्यांची यादी मोठी आहे असचं म्हणावं लागेल. यामध्ये राज्य मंत्रीमंडळाचे सदस्य असणारे भाजपाचे नेते प्रकाश मेहता, आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेता सर्बानंद सोनोवाल आणि भाजपाच्या मध्यप्रदेशमधील खासदार रिती पाठक या नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही समावेश चुकीचा फोटो ट्विट करणाऱ्या नेत्यांमध्ये आहे. तुम्हीच पाहा त्यांचे ट्विटस…

प्रकाश मेहता

सर्बानंद सोनोवाल

रिती पाठक

जयंत पाटील

कोणते आहे हे जहाज

अनेक नेत्यांनी भरतीय नौदल दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी वापरलेला फोटो हा अमेरिकन नौदलातील फ्रीडम प्रकारातील लिटलॉर शैलीच्या युद्धनौकेचा आहे. या युद्धनौकांचा २००५ सालामध्ये अमेरिकन नौदलामध्ये समावेश करण्यात आला आहे.

First Published on December 6, 2018 4:44 pm

Web Title: indian politicians tweeted us navy ship photo to wish indian navy day