21 November 2019

News Flash

भारतीय रेल्वे देणार प्रवाशांना मसाज सेवा, ३९ ट्रेन्समध्ये मिळणार सुविधा; पहा संपूर्ण यादी

भारतीय रेल्वे ट्रेनमधील प्रवाशांना लवकरच मसाज सेवा उपलब्ध करुन देणार आहे

IRCTC: भारतीय रेल्वे ट्रेनमधील प्रवाशांना लवकरच मसाज सेवा उपलब्ध करुन देणार आहे. प्रवाशांना पाय आणि डोक्याची मसाज दिली जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने हा प्रस्ताव मांडला आहे. रतलाम विभागाने ट्रेनमधील प्रवाशांना पाय आणि डोक्याच्या मसाजची सुविधा देण्यासाठी ३९ ट्रेनसाठी एक LOA म्हणजेच लेटर ऑफ अवॉर्ड जारी केलं आहे. पुढील १५ ते २० दिवसांत ही सुविधा सुरु केली जाईल असं सांगितलं जात आहे. ही सुविधा रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत दिली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ मिनिटांच्या मालिशसाठी प्रवाशांना १०० रुपये खर्च करावे लागतील. क्रीमचा वापर केला असता १५ ते २० मिनिटांच्या डायमंड मसाजसाठी २०० रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय प्लेटिनम मसाजसाठी ३०० रुपये खर्च येईल.

या ट्रेनमध्ये मिळणार ही सुविधा –
1- ट्रेन नंबर: 12913/12914 INDB-NGP एक्सप्रेस
2- ट्रेन नंबर: 12919/12920 DADN-SVDK (मालवा एक्सप्रेस)
3- ट्रेन नंबर: 12923/12924 INDB-NGP एक्सप्रेस
4- ट्रेन नंबर: 12961/12962 अवंतिका एक्सप्रेस
5- ट्रेन नंबर:19301/19302 DADN-YPK एक्सप्रेस
6- ट्रेन नंबर: 19303/19304 INDB-BPL एक्सप्रेस
7- ट्रेन नंबर: 19305/19306 INDB-GHY एक्सप्रेस
8- ट्रेन नंबर: 19307/19308 INDB-CDG एक्सप्रेस
9-ट्रेन नंबर: 19309/19310 INDB-CDG एक्सप्रेस
10- ट्रेन नंबर: 19309/19310 INDB-CDG एक्सप्रेस
11- ट्रेन नंबर: 19313/19314 INDB-RJPB एक्सप्रेस
12- ट्रेन नंबर: 19316/19315 हमसफर एक्सप्रेस
13- ट्रेन नंबर: 19317/19318 हमसफर एक्सप्रेस।
14 – ट्रेन नंबर: 19320/19319 महामना एक्सप्रेस
15- ट्रेन नंबर: 19321/19322 INDB-RJPB एक्सप्रेस
16- ट्रेन नंबर: 19323/19324 INDB-BPL एक्सप्रेस
17- ट्रेन नंबर: 19325/19326 INDB-ASR एक्सप्रेस
18- ट्रेन नंबर: 19329/19330 INDB-UDZ एक्सप्रेस
19- ट्रेन नंबर: 19331/19332 INDB-KCVL एक्सप्रेस
20- ट्रेन नंबर: 19333/19334 महामना एक्सप्रेस
21- ट्रेन नंबर: 19336/19335 INDB-GIMB एक्सप्रेस
22- ट्रेन नंबर: 19337/19338 INDB-DEE एक्सप्रेस
23- ट्रेन नंबर: 22911/22912 INDB-HWH शिप्रा एक्सप्रेस
24- ट्रेन नंबर: 22941/22942 INDB-JAT एक्सप्रेस
25- ट्रेन नंबर: 22944/22943 INDB- पुणे एक्सप्रेस
26- ट्रेन नंबर: 11125/11126 INDB-GWL एक्सप्रेस
27- ट्रेन नंबर: 11703/11704 REWA-INDB एक्सप्रेस
28- ट्रेन नंबर: 12416/12415 NDLS-INDB इंटरसिटी एक्सप्रेस
29- ट्रेन नंबर: 12974/12973 जेपी-इंडियाबी एक्सप्रेस
30- ट्रेन नंबर: 14309/14310 UJN-DDN Ujjayani एक्सप्रेस
31- ट्रेन नंबर: 14317/14318 DDN-INDB एक्सप्रेस
32- ट्रेन नंबर: 14801/14802 JU-INDB एक्सप्रेस
33- ट्रेन नंबर: 18234/18233 BSP-INDB नर्मदा एक्सप्रेस
34- ट्रेन नंबर: 19664/19663 कुरज-भारत एक्सप्रेस
35- ट्रेन नंबर: 21125/21126 RTM-BIX एक्सप्रेस
36- ट्रेन नंबर: 22191/22192 INDB-JBP एक्सप्रेस
37- ट्रेन नंबर: 22646/22645 TVC-INDB अहिल्या नगरी एक्सप्रेस
38- ट्रेन नंबर: 22983/22984 कोटा-भारत इंटरसिटी एक्सप्रेस
39- ट्रेन नंबर: 59385/59386 INDB-CWA पंचवाल यात्री

First Published on June 11, 2019 5:05 pm

Web Title: indian railway massages service railway passenger list of 39 trains sgy 87
Just Now!
X