News Flash

भारतीय जेवणाची चव आवडली, ‘त्या’ ग्राहकासाठी फ्रान्समध्ये विमानानं पाठवलं जेवण

जेटनं भारतीय हॉटेलमधून जेवण फ्रान्सला पाठवण्यात आलं

आकाश रेस्तॉराँनं सोशल मीडियावर याचा व्हिडिओ अपलोड केला आहे.

विविध मसाले वापरून तयार केलेल्या लज्जतदार भारतीय जेवणाची चव एकदा का कोणी परदेशी नागरिकानं चाखली की तो त्या खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही हे नक्की. युकेमधल्या आकाश रेस्तॉराँमधल्या भारतीय जेवणाची चव ब्रिटीश नागरिकाला एवढी आवडली की त्याच्या मागणीखातर या हॉटेलनं हॅम्पशायरवरून फ्रान्समध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी पाठवली. यासाठी खासगी चाटर्ड प्लेननं पदार्थ फ्रान्समध्ये पाठवण्यात आले.

‘या’ २२ वर्षीय मॉडेलची कमाई ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

वर्गमित्रानं सांगितल्या क्रूर हुकूमशहा किम जाँगच्या बालपणातील रंजक गोष्टी

Viral Video : फेडररपुढे महिला टेनिसपटूंचं चालेना, व्हिडिओ व्हायरल

आकाश रेस्तॉराँनं सोशल मीडियावर याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. १० प्रकरच्या कैरीपासून तयार केलेल्या चटण्या, ७५ भातांचे प्रकार, आणि ७० वेगवेगळे भारतीय पद्धतीचे जेवणाचे प्रकार मागवण्यात आले होते. फ्रान्समध्ये मिळणारं भारतीय पद्धतीचं जेवण मला मुळीच आवडलं नाही, म्हणूच मी हॅम्पशायरवरून जेवण मागवलं असल्याचं त्या ग्राहकानं स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 5:58 pm

Web Title: indian restaurant delivers curry to france in a chartered private plane
Next Stories
1 ‘या’ २२ वर्षीय मॉडेलची कमाई ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
2 वर्गमित्रानं सांगितल्या क्रूर हुकूमशहा किम जाँगच्या बालपणातील रंजक गोष्टी
3 ‘कपड्यांमुळे बलात्कार होत नाही!’
Just Now!
X