News Flash

भारतीय शेफच्या जेवणावर खूश होऊन व्यावसायिकाने दिली तब्बल ८३ हजारांची टीप

जेवणाचे बिल ६, ५०० रुपये झाले होते

( छाया सौजन्य : The Indian Tree )

हॉटेलमध्ये गेल्यावर हॉटेलचे जेवण आवडले की आपण बिलाचे पैसे देताना टीपही देतो. साधरण १० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत टीप दिलेल्या तुम्ही पाहिल्या असतील पण एका व्यवसायिकाने भारतीय हॉटेलमधील पदार्थाच्या चवीवर आणि सेवेवर खूश होऊन एक दोन हजारांची नाही तर चक्क ८३ हजारांची टीप येथील शेफला दिली. या व्यसायिकाचे बील फक्त ६, ५०० एवढेच झाले होते पण त्याने बिलाच्या तब्बल ११ पटीने अधिक पैसे टीप म्हणून या हॉटलेला दिले.
Viral Video : सफरचंद सोलण्याची भन्नाट पद्धत

युकेमधल्या ‘द इंडियन ट्री’ या हॉटेलमध्ये बाबू हे शेफ म्हणून काम करतात. खास त्यांच्या हातचे जेवायला या हॉटेलमध्ये आर्यलँडमधला एक व्यवसायिक येतो. या व्यवसायिकाला बाबूच्या हातचे जेवण एवढे आवडले की तो येथे आला की घरी जायच्या आधी हॉटेलमध्ये पोटभर जेवतो. belfastlive.co च्या माहितीनुसार त्याने बाबूच्या जेवणावर खूश होऊन त्याला ८३ हजारांची टीप देऊ केली. या व्यवसायिकाने आपले नाव मात्र सांगितले नाही. ६५०० रुपयांचे बिल देऊ केल्यानंतर त्याने बाबूला बाहेर बोलवले आणि त्याच्या जेवणासाठी टीप देण्याचे बोलून दाखवले. पण हा आकडा बिलाच्या ११ पटींहूनही अधिक होता. हा आकडा पाहून बाबूलाच काय हॉटेलच्या मालकालाही धक्का बसला पण या व्यवसायिकाने स्वखुशीने एवढी मोठी रक्क देऊ केल्याने हॉटेलने आढेवेढे न घेता ही रक्कम स्विकारली. या टीपचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : मीठ चवीनुसार नाही तर ‘स्टाईलनुसार’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 12:42 pm

Web Title: indian restaurant gets 83000 tip against bill of rs 6500
Next Stories
1 भारतातल्या १% गर्भश्रीमंतांकडे देशातली ५८% संपत्ती..
2 मुलायम-अखिलेश सायकलवरुन भांडताना प्रतीक यादवची ५ कोटींच्या गाडीतून सवारी
3 या घरात भरून राहिली शतकापूर्वीची फ्रेंच कलासक्ती
Just Now!
X