08 March 2021

News Flash

दुबईत राहणारा भारतीय दुकानदार बनला कोट्यधीश

साडे सहा कोटींची लॉटरी

दुबई ड्युटी फ्री च्या लकी ड्रामध्ये आजेझ यांनी ६ करोड ७० लाख जिंकले. ( छाया सौजन्य : आजतक )

कोणाचं नशीब कधी पालटेल काही सांगता येत नाही, दुबईत राहणा-या एका भारतीय दुकानदाराचेही असेच झाले. दुकान चालवून थोडेफार पैसे मिळवणा-या आजेझ यांना आपण कधी कोट्यधीश होऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते. या महिन्यात दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर लॉटरीची सोडत काढण्यात आली, आजेझ पद्मनाभन यांनी देखील हौसेपोटी एक तिकिट खरेदी केले पण त्यांना आश्चर्याचा धक्क तेव्हा बसला जेव्हा त्यांना साडे सहा कोटींची लॉटरी लागल्याचे आयोजकांनी जाहिर केले.

वाचा : फक्त ५०६ टन सामान घेऊन सौदी राजा निघाला इंडोनेशियाला

वाचा : अन् संसदेत खासदाराऐवजी खेळण्याला बसवलं

दुबई ड्युटी फ्री च्या लकी ड्रामध्ये आजेझ यांनी ६ करोड ७० लाख जिंकले. आजेझ यांनी  या लॉटरीच्या तिकिटाची ऑनलाइन खरेदी केली होती. त्यांच्या तिकिटाचा क्रमांक होता १५८४. दुबईमधल्या शरजहाँ येथे ते राहतात. आजेझनां दोन मुलं आहेत. येथे ते दुकान चालतात. एका लॉटरीच्या तिकिटाने आपले रातोरात श्रीमंत होऊ अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती.

व्हिडिओ: तिची छेड काढणाऱ्यांना तिने दाखवला इंगा

वाचा : रस्त्याच्या कडेला उपाशीपोटी झोपणा-या आजींसाठी ‘तो’ ठरला देवदूत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:58 pm

Web Title: indian storekeeper won 1 million in dubai duty frees lucky draw
Next Stories
1 फक्त ५०६ टन सामान घेऊन सौदी राजा निघाला इंडोनेशियाला
2 अन् संसदेत खासदाराऐवजी खेळण्याला बसवलं
3 कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबईतला तरुण अशी करतोय मदत
Just Now!
X