News Flash

जेव्हा पाकिस्तानी खेळाडू भारतीय टॅक्सी चालकाला म्हणतात, चलो हमारे साथ खाना खाने !

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात घडला प्रसंग

पाकिस्तानी खेळाडू भारतीय टॅक्सीचालकासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना, फोटो सौजन्य - ESPNCricinfo

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं द्वंद्व आपण प्रत्येक पातळीवर अनुभवत असतो. कित्येकदा क्रिकेटच्या मैदानावर हे दोन्ही संघ जेव्हा समोरासमोर येतात, त्यावेळी या सामन्याला एखाद्या युद्धाचं स्वरुप येतं. मात्र या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन ऑस्ट्रेलियात भारतीय टॅक्सी चालक आणि पाकिस्तानी संघातील खेळाडूंची एक वेगळी बाजू समोर आली आहे.

पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांना डावाने पराभवाचा सामना करावा लागला. स्थानिक ABC Radio ची प्रतिनिधी अ‍ॅलिसन मिचेलने, समालोचनादरम्यान पाकिस्तानी खेळाडू आणि भारतीय टॅक्सीचालकामधला एक प्रसंग सांगितला. शाहिन आफ्रिदी, यासिर शाह, नसीम शाह आणि इतर दोन सहकारी रात्री जेवणासाठी बाहेर पडलेले असताना, एका भारतीय टॅक्सी चालकाने त्यांना भारतीय रेस्टॉरंटपर्यंत सोडलं. यावेळी टॅक्सीचालकाने खेळाडूंची ओळख ठेवत त्यांच्याकडून भाडं स्विकारण्यास नकार दिला, बदल्यात खेळाडूंनीही भारतीय टॅक्सीचालकाला आपल्यासोबत जेवायचं निमंत्रण दिलं.

पाकिस्तानकडून बाबर आझमने पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. मात्र मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 3:29 pm

Web Title: indian taxi driver refuses to take money treated to dinner by pakistan cricketers psd 91
Next Stories
1 देवभोळा चोर! आधी केली दुर्गादेवीची पूजा आणि मग चोरले दागिने
2 Video: कालव्यामध्ये शिरले डॉल्फिन, मासे पाहण्यासाठी गोळा झाले दहा हजार लोक
3 Video: बिबट्या आणि अजगराच्या झुंजीचा थरार…
Just Now!
X