25 October 2020

News Flash

Viral Video : सानिया मिर्झाचा ‘तो’ डान्स व्हायरल

इन्स्टाग्रामव्दारे दिले अपडेट

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. ती इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न करत असते. इतकेच नाही तर आपल्या फॅन्सना प्रतिक्रिया देत ती त्यांना खूश करत असते. नव्या वर्षाच्या निमित्ताने सानियाने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून खूश केले आहे. आपल्या चाहत्यांना तिने नवीन वर्षानिमित्त एक भेट दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला डान्स करतानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सानिया सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील स्वॅग से स्वागत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सध्या ती दुबईमध्ये असून तिथे ती डान्स क्लासमध्ये हा डान्स करत आहे. पहिल्यांदाच आपण अशाप्रकारे डान्स क्लासला प्रवेश घेतला असल्याचेही ती म्हणते. नव्या वर्षीचा डान्स असा असेल असे या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे. तिचा हा डान्सचा व्हिडिओ लोकांकडून मोठ्या प्रमाणात लाईक केला जात आहे. तिचा हा व्हिडिओ २ लाख ५२ हजार जणांनी पाहिला आहे. गुडघ्याला इजा झाल्यामुळे सानिया काही दिवसांपासून टेनिसपासून दूर होती. या दुखण्यामुळे ती ऑस्ट्रेलिया ओपनमध्येही खेळू शकली नाही. त्यामुळे सध्या ती काही दिवसांसाठी आराम करण्यासाठी दुबईमध्ये गेली आहे. काही दिवसांपुर्वीच तिने आपला दुबईतील एक फोटो शेअर करत तेथील स्नोची मजा घेत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर आता तिचा हा व्हिडिओ नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 7:55 pm

Web Title: indian tennis star sania mirza dance video viral
Next Stories
1 आनंद महिंद्रा रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये गुंतवणूक करणार?
2 …म्हणून पाकिस्तानात डोरेमॉनवर संपूर्ण बंदीची आमदाराची मागणी
3 …आणि तिने पायाने काढले सर्वात मोठे चित्र
Just Now!
X