इंडोनेशियामध्ये एक ५४ वर्षीय महिला हरविल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी केली होती. वा टिब्बा असे या महिलेचे नाव होते. तिच्या कुटुंबियांनी ती हरविल्याची तक्रारही पोलिसात दाखल केली. आपल्य़ा भाजीच्या मळ्यात काम करताना ही महिला अचानक गायब झाल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. विशेष म्हणजे काही काळाने तिचा शोध लागला आणि ती ७ मीटर लांबीच्या अजगराच्या पोटात सापडली. हा अजगर महिला ज्या शेतात काम करत होती तिथेच सापडला. गावात असलेला एक अजगर इतका कसा फुगला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तेव्हा ही महिला अजगराने तर गिळली नसेल ना अशी शंका नागरिकांना आली. त्यावेळी त्याला मारुन बगिचातून बाहेर आणण्यात आले. चक्क नागरिकांची शंका खरी ठरली आणि या अजगराला कापून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडोनेशिया आणि फिलिपाईनमध्ये सहा मीटरपर्यंत अजगर सापडणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. लहान जनावरांवर हल्ला करण्यासाठी हे अजगर ओळखले जातात. काही वेळा ते माणसांनाही खात असल्याची चर्चा गावात होती. त्याचप्रमाणे या महिलेचीही हत्या करुन तिला गिळल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला हे अजगर आपल्या दातांनी शिकारीवर हल्ला करतात. मग मृत्यू होईपर्यंत ते त्याला दाबत राहतात. शिकार पूर्ण झाल्यानंतर ते त्या प्राण्याला गिळतात. अशाचप्रकारे टिब्बा या महिलेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले.

याआधी शेतात काम करत असताना २५ वर्षीय अकबर नावाच्या शेतक-याला अजगराने गिळले होते. हा अजगर झाडीत लपला होता. पोट फुगवून बसलेल्या अजगराला पाहून गावक-यांना शंका आली. त्यांनी अजगराचे पोट फाडून बघितले असता त्यात अकबरचे मृत शरीर त्यांना दिसले. हे पाहून गावक-यांच्या अंगावरही काटा उभा राहिला. या प्रकरणानंतर गावात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. याआधी अजगरांनी पाळीव प्राण्यांना किंवा जनावरांना गिळल्याचे अनेकदा पाहिले आहे पण माणसाला गिळण्याचा पहिलाच प्रकार असल्याचे गावच्या सरपंचांनी सांगितले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indonesia women missing found dead inside 7 meter python
First published on: 18-06-2018 at 18:32 IST