News Flash

गुगलचे आधीचे नाव माहित आहे का?

४ सप्टेंबर रोजी टायटॅनिक जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटो सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते.

गुगलचे आधीचे नाव माहित आहे का?

आपल्याला माहित नसणारी एखादी गोष्ट शोधणे हल्ली सोपे झाले आहे. एखादा रस्ता शोधण्यापासून ते जगाच्या पाठीवरची कोणतीही माहिती मिळविण्यासाठी गुगल आपल्या दिमतीला उभा असतो. यातही बहुतांशवेळा गुगल आपल्याला हवी ती माहिती देण्यात यशस्वीही होतो. त्यामुळे या मायाजालाने आपले आयुष्य सोपे केले आहे असे म्हणता येईल. एखाद्या लहान मुलालाही काही शोधायेच असल्यास गुगल नक्की मदत करु शकेल हे माहित असते. गुगलप्रमाणे अनेक सर्च इंजिन आली, मात्र गुगलपुढे त्यांचा म्हणावा तितका टिकाव लागला नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून जगभरात प्रसिद्ध असणारे हे सर्च इंजिन प्रसिद्ध होत गेले. या सर्च इंजिनचे आधीचे नाव काय होते असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर त्याचे उत्तर बहुतांश जणांना माहित नसेल.

१९९८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गुगलचे आधीचे नाव होते बॅकरब. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या संशोधकांनी गुगलची निर्मिती केली. ४ सप्टेंबर रोजी टायटॅनिक जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटो सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. शोधण्यात आलेली वेबसाईट किती महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी ते बॅक लिंक्स पद्धतीबरोबरच त्या साईटशी संबंधित इतर साईट्सचा वापर करत असत. त्यामुळे त्याचे नाव बॅकरब असे ठेवण्यात आले. बॅकरब हे जोपर्यंत कमी ब्रॅण्डविड्थ वापरत होते तोपर्यंत ते स्टॅण्डफर्डचाच सर्व्हर वापरत होते.

१९९७ मध्ये बॅकरब हे नाव तितकेसे चांगले नसल्याचे लक्षात आले. मग आहे ते नाव बदलून काय ठेवायचे यावर बऱ्याच चर्चा झाल्या आणि विचारही करण्यात आला. मग गणितातील एका संकल्पनेवरुन हे नाव ठेवण्यात आले. googol याचा अर्थ एकावर १०० शून्य असा होतो. म्हणजेच एक गोष्ट शोधल्यावर १०० गोष्टी सापडतील असे. मग याचेच पुढे Google झाले. जगभरात असलेली माहिती योग्य पद्धतीने साठवणे हा कंपनीचा सुरुवातीला मुख्य उद्देश होता. त्यानंतर कंपनीने आपल्या वेगवेगळ्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 1:15 pm

Web Title: interesting facts about google know what was the name of google before backrub
Next Stories
1 डेले चॅलेंज : ‘डेले’ डेले पे लिखा है!
2 VIDEO : या हॉटेलमध्ये ‘डायनोसॉर’ करतो स्वागत
3 ये रेशमी जुल्फें..! ५ वर्षाच्या मुलीचे केस पाहून थक्क व्हाल
Just Now!
X