07 December 2019

News Flash

Women’s Day 2019 : जागतिक महिला दिन 8 मार्चला का साजरा केला जातो?

१९०९ पर्यंत महिला दिन २८ फेब्रुवारीला साजरा केला जायचा.

International Women’s Day 2019 : जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.

१९०९ पर्यंत महिला दिन २८ फेब्रुवारीला साजरा केला जायचा. आंतरराष्ट्रीय महिला वस्त्रे निर्मिती कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी महिला दिन साजरा करण्यात आला होता. ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा, असे ठरविण्यात आले होते. पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता. त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यादिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला होता. पण त्यानंतर ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला. महिला दिन हा कोणत्याही संघटनेचा म्हणून ओळखला जात नाही. तर जगभरातील वेगवेगळ्या देशांतील सरकारांकडून महिला दिन साजरा केला जातो. या निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.

महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते. तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांनी मिळवलेल्या यशाचा, अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने काही मार्गदर्शक तत्त्वे, कार्यक्रम निश्चित केले आहेत.

जागतिक महिला दिन आणि जांभळा रंग यांचं कनेक्शन काय? :

जांभळ्या रंगाच्या कनेक्शन मागे इतिहास आहे. लिंग समानता म्हणजेच Gender Equality चे प्रतिक म्हणून या रंगाकडे पाहिले जाते. जांभळा रंग हा ‘महिला मुक्तता आंदोलन’ याचं देखील प्रतिक आहे. स्त्रियांनी इतिहासात दिलेल्या त्यांच्या अधिकार आणि हक्काच्या लढ्यांमध्ये हाच जांभळा रंग प्रतिकात्मकतेने वापरण्यात आला होता.

यंदा महिला दिनाची थीम काय? : ‘Think Equal, Build Smart, Innovate for Change या थीमवर आधारित महिला दिनाचे सेलिब्रेशन करताना जांभळा रंग वापरायला विसरू नका.

First Published on March 8, 2019 11:38 am

Web Title: international womens day 2019 all you need to know date importance
Just Now!
X