अमेरिकेमध्ये एका ग्राहकाच्या iPhone X चा स्फोट झाला आहे. आयफोन एक्समध्ये iOS 12.1 चं अपडेट सुरू असताना हा स्फोट झाला. केवळ 10 महिन्यांपूर्वी त्या ग्राहकाने हा आयफोन खरेदी केला होता.


संबंधित ग्राहकाने ट्विटरवर स्फोट झालेल्या आयफोनचे फोटो शेअर केले आहेत. आयफोनमध्ये iOS 12.1 चं अपडेट करत असताना फोनमधून पहिल्यांदा धूर निघाला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी आयफोन कंपनीच्या चार्जारद्वारेच चार्ज केला जात होता असंही या ग्राहकाने म्हटलं आहे. स्फोट झाल्यानंतर त्याने चार्जर काढून टाकलं. ग्राहकाने ट्विटरद्वारे केलेल्या तक्रारीनंतर याबाबतची चौकशी केली जाईल असं अॅपलने म्हटलं आहे.

आयफोनमध्ये स्फोट झाल्याचं हे पहिलंच वृत्त नाहीये. यापूर्वी अनेकदा आयफोनचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सॅमसंग गॅलेक्सी आणि शाओमीच्या फोनमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्याही मध्यंतरी आल्या होत्या.