क्रिस आणि डेवन ब्रावो हे दोघंही आलयपीएलमधून भिन्न संघातून खेळत आहेत. हे संघ जरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी क्रिस आणि ब्रावो यांच्या मैत्रीत त्याचा फारसा फरक पडला नाही. वेगवेगळ्या संघातून खेळणाऱ्या या दोघांनी काल झालेल्या मॅचमध्ये आपल्या मैत्रीचं उदाहरण जगाला दाखवून दिलं.

चैन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये काल झालेल्या सामन्यात मैत्रीचा एक अनोखा क्षण  प्रेक्षकांना पाहायला मिळाला. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा क्रिस मैदानावर खेळण्यासाठी आला. पण त्याआधीच क्रिसच्या शूजचे लेस सुटले, अर्थात त्यानं प्रश्नार्थक नजरेनं डेवन ब्रावोकडे पाहिलं. ‘भावा, माझ्या शू लेस बांधतोस का?’ असं क्रिसनं विचारल्याबरोबर प्रतिस्पर्धी संघातून खेळणारा ब्रावो पुढे आला आणि त्यांनं क्रिसच्या शूजची लेस बांधून दिली. दोन वेगवेगळ्या संघाचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या ब्रावो आणि क्रिसनं यावेळी आपल्या मैत्रीचं वेगळं उदाहरण जगाला दाखवून दिलं.

आयपीएलच्या अकराव्या हंगामात रंगलेल्या या समन्यात चेन्नई सुपरकिंग्जला किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. चेन्नईला केवळ चार धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात गेलने ३३ चेंडूत ६३ धावांची खेळी केली.