News Flash

Video : टीम कोहलीचं सोशल मीडियावर सुरू आहे ‘विराट’ प्रमोशन

विराटला नाचताना पाहून दोघांनाही हसू अनावर

चहलनं शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

आयपीएल सुरू होत आहे. सामने सुरू होण्याआधी प्रत्येक टीमनं चांगली कंबर कसली आहे. सध्या सामान्यात खेळणाऱ्या टीमचं सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि कोहलीचा ‘विराट’ संघही प्रमोशनसाठी चांगलीच कंबर कसतोय.

रॉयल चैलेंजर्स बंगळूरु संघाच्या प्रमोशनल व्हिडिओची एक क्लिप युझवेंद्र चहलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. विराट, चहल आणि ब्रेंडन मैक्कुलम हे तिघंही डान्स करताना व्हिडिओत दिसत आहेत. पण मैदानात खेळणाऱ्या ब्रेंडन आणि चहलला मात्र प्रमोशनसाठी डान्स करताना काहीसं अवघडल्यासारखं झालं होतं. त्यामुळे विराटला नाचताना पाहून दोघांनाही आपलं हसू अनावर होत होतं. चहलनं शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

आतापर्यंत झालेल्या दहा हंगामात रॉयल चैलेंजर्स बंगळूरुनं एकदाही लीग जिंकली नाही. यंदा संघात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत आणि विराटनंही चांगलीच मेहनत घेतली आहे त्यामुळे या हंगामाचं विजेतेपद मिळवण्यास रॉयल चैलेंजर्स बंगळूरुला यश येतंय का हे पाहण्यासारखं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 1:01 pm

Web Title: ipl 2018 rcb yuzvendra chahal posted a video of him with captain kohli and brendon mccullum
Next Stories
1 Social viral : या मुस्लीम मुलीच्या अस्खलित मराठीनं जिंकली सगळ्यांची मनं
2 याड लावणारं हे ‘खुळं’ आलं कुठून?
3 बिग बींच्या फोनचं मध्यरात्री अचानक गेलं नेटवर्क, म्हणाले…
Just Now!
X