03 December 2020

News Flash

IPL 2020 : स्टॉयनिस शून्यावर बाद पण सोशल मीडियावर गंभीर होतोय ट्रोल, जाणून घ्या कारण…

बोल्टने पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला धाडलं माघारी

आयपीएलच्या इतिहासात आपला पहिला अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची मुंबई इंडियन्ससमोर खराब सुरुवात झाली. हैदराबादविरुद्ध सामन्यात दिल्लीने स्टॉयनिसला सलामीला पाठवत सर्वांना धक्का दिला. सुदैवाने हैदराबादविरुद्ध सामन्यात दिल्लीची ही रणनिती चांगलीच जमून आली. परंतू मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीचा हुकुमी एक्का सपशेल फेल ठरला. फॉर्मात असलेल्या मुंबईच्या ट्रेंट बोल्टने स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. अंतिम फेरीच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होण्याची ही पहिली वेळ ठरली.

मार्कस स्टॉयनिस अपयशी ठरला असला तरीही सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरला ट्रोल करायला सुरुवात केली. हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना?? जाणून घ्या काय आहे कारण…

गौतम गंभीरने सामना सुरु होण्याआधी फँटसी लिग खेळणाऱ्यांना स्टॉयनिसला कर्णधार करण्याचा सल्ला दिला. आपणही त्याचीच निवड केल्याचं गंभीरने एका व्हिडीओ कार्यक्रमात सांगितलं. मात्र तोच फलंदाज शून्यावर बाद झाल्यामुळे नेटकऱ्यांनी चुकीचा सल्ला देणाऱ्या गंभीरला ट्रोल करायला सुरुवात केली.

स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 10:14 pm

Web Title: ipl 2020 fans troll gautam gambhir after his advice to make stoinis to make captain in fantasy league psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : श्रेयसची कर्णधारपदाला साजेशी खेळी, धोनी-रोहित-कोहलीच्या पंगतीत स्थान
2 IPL 2020 : देर आए दुरुस्त आए, मोक्याच्या क्षणी ऋषभला गवसला सूर पण…
3 IPL 2020:…अन् दिल्लीकडून अंतिम सामना खेळत शिखर धवनने केला अनोखा विक्रम
Just Now!
X