इंडियन प्रमिअर लिग स्पर्धेच्या तेराव्या हंगामात बुधवारी झालेल्या सामन्यांत मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ५ गडी राखून मात केली. सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चीत केलं आहे. या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलाच थरार रंगलेला पहायला मिळाला. हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिस यांच्यात रंगलेलं शाब्दिक युद्ध आणि हार्दिकचा आक्रमक अवतार सर्वांनी पाहिला. परंतू याव्यतिरीक्तही सूर्यकुमार यादवची विकेट मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या विराट कोहलीने थेट मैदानातच सूर्यकुमारवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.
जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय??
बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हा प्रकार घडला. डेल स्टेन टाकत असलेल्या १३ व्या षटकात सूर्यकुमारने चौकार लगावला. यानंतर शेवटच्या चेंडूवर कव्हर्सच्या दिशेने खेळलेला सूर्यकुमारचा फटका विराटने अडवला. अथक प्रयत्न करुनही सूर्यकुमारची विकेट मिळत नसल्यामुळे विराटने यावेळी सूर्यकुमारच्या दिशेने चालत जाऊन काहीही न बोलता त्याला खुन्नस देत दडपण आणण्याचा प्रयत्न केला. परंतू सूर्यकुमारही आपली नजर न हटवता नंतर आपल्या खास अंदाजात विराटकडे दुर्लक्ष करत नॉन स्ट्राईक एंडला चालत गेला. पाहा हा व्हिडीओ…
Here's the full video… SKY pic.twitter.com/ACo039dpNO
— Har$ha (@_harshareddy) October 28, 2020
अखेरपर्यंत सूर्यकुमार यादवला बाद करण्यात बंगळुरुचे गोलंदाज अयशस्वीच ठरले. विजयी चौकार लगावत सूर्यकुमारनेही मी आहे ना…असं म्हणत डग आऊटमध्ये बसलेल्या हार्दिक पांड्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या अर्धशतकी खेळीत सूर्यकुमारने १० चौकार आणि ३ षटकार लगावले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 29, 2020 12:20 pm