22 February 2020

News Flash

Once Upon a Time in Rajasthan : पाहा, आयपीएलच्या संघांचा फिल्मी अंदाज

ऑस्करच्या निमित्ताने तयार केलं खास पोस्टर

आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्यासाठी बराच कालावधी आहे. हंगामाच्या वेळापत्रकाबद्दल अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. मात्र त्याआधीच आयपीएलचे संघ फिल्मी अंदाजात समोर आले आहेत. निमीत्त होतं, नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं…

राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघानी बॉलिवूड-हॉलिवूड चित्रपटांच्या नावाने आपलं पोस्टर तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टीव्ह असणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने Once Upon a Time in Mumbai च्या धर्तीवर Once Upon a Time in Rajasthan असं पोस्टर तयार केलं आहे.

दिल्लीच्या संघानेही मग आपली क्रिएटीव्हीटी दाखवत आपलं पोस्टर तयार केलं.

तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 1917 हा हॉलिवूड चित्रपट आणि १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत रवी बिश्नोईने घेतलेल्या १७ बळींचा धागा जोडत पोस्टर तयार केलं आहे.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, २९ मार्चला आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

First Published on February 13, 2020 9:47 am

Web Title: ipl franchises share their own version of movie posters on the occasion of the 92nd academy awards psd 91
Next Stories
1 जायबंदी मॅक्सवेल ‘आयपीएल’ला मुकणार?
2 हार्दिक पंडय़ाचे लवकरच पुनरागमन?
3 पृथ्वीऐवजी शुभमनला हरभजनचा पाठिंबा