इराक- इराणच्या सीमेवर रविवारी रात्री झालेल्या तीव्र भूकंपामुळे एकाच रात्री हजारो लोक बेघर झाले. शेकडो लोक मृत्युमूखी पडले तर तितकेच जखमीही झाले. त्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी मदतकार्याला सुरूवात केली. जखमींची सुश्रूषा करणं, त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणं, ढिगारे उपसणं अशाप्रकारचे मदतकार्याला येथे सुरू आहे. मात्र, येथील एकूणच दृश्य विदारक आणि मनाला सुन्न करणारे आहे. या मदतकार्यादरम्यान घडलेल्या एका भावूक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नक्कीच अनेकांच्या काळजाला भिडणारा आहे.

Video : शो मस्ट गो ऑन; भूकंपाचे धक्के बसत असतानाही वृत्तवाहिनीवर कार्यक्रम सुरूच

Viral Video : फुलांच्या माळांऐवजी वधू-वराने ऐकमेकांच्या गळ्यात साप घातले

साधारण चार एक वर्षांचा भूकंपग्रस्त चिमुरडा आपल्या मैत्रीणीला अन्न मिळालं नाही, म्हणून अस्वस्थ झाला होता. ती उपाशी राहू नये म्हणून तिच्या काळजीपोटी त्याने तिच्या हातला पकडलं आणि अन्नवाटप सुरू होतं तिथे तो तिला घेऊन गेला. तुम्ही सगळ्यांना अन्न दिलं पण माझ्या मैत्रिणीला मात्र तुम्ही अन्न दिलं नाही, असं तो सगळ्यांना ओरडून सांगत होता. त्याच्या आर्त हाकेने त्यानं स्वयंसेवकांचं लक्ष वेधून घेतलं.
तेव्हा स्वयंसेवकांनी पुढे येऊन या दोघांनाही अन्नचा बॉक्स देऊ केला. आता आपल्या मैत्रिणीला उपाशी राहावं लागणार नाही, याचा आनंद या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरवरून ओसंडून वाहत होता. एका इराणी पत्रकारानं हा व्हिडिओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.