सहार तबार ही १९ वर्षांची तरूणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखा दिसण्याचा अट्टाहास तिला नडला. अँजेलिनासारखे दिसण्यासाठी तिने चेहऱ्यावर तब्बल ५० शस्त्रक्रिया करून घेतल्याची चर्चा आहे. मात्र, या शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्यामुळे सहारचा चेहरा विद्रूप होऊन बसला. सोशल मीडियावर याची बरीच चर्चाही रंगली आहे. अखेर सहारने पुढे येत या सगळ्याबद्दलचा खुलासा केला आहे.

मेहंदीसाठी ‘या’ नववधूनं चक्क ऐश्वर्यासारखा गाऊन तयार करून घेतला

बाहुल्यासारखं दिसण्यासाठी त्यानं केले कोट्यवधी खर्च

इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून तिने आपल्याबद्दल उठलेल्या अफवांचं वादळ परतवून लावलं आहे. मी अँजेलिना जोलीसारखी दिसण्यासाठी शस्त्रक्रिया केली नाही. हा विद्रुप चेहरा म्हणजे फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर आणि मेकअपची कमाल असल्याचं तिनं सांगितलं आहे. काहींच्या मते तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी शस्त्रक्रियांचा पब्लिसिटी स्टंट केला होता. सहारनं आपण हटके काहीतरी करण्यासाठी फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर आणि मेकअपची मदत घेतल्याचं कबुल केलं आहे.