वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारी ग्रेटा थनबर्ग पर्यावरण रक्षणासाठी केल्या जाणाऱ्या चळवळींमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी ग्रेटा कोणत्याही प्रकारची चळवळ किंवा भाषणामुळे नव्हे, तर चक्क टाईम ट्रॅव्हलिंगमुळे चर्चेत आहे.

ग्रेट्राचा चेहरा १२० वर्षांपूर्वी काढलेल्या एका मुलीच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे. १८९८ साली काढलेला हा फोटो सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्या मुलीच्या चेहऱ्याची तुलना ग्रेटाशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ती एक टाईम ट्रॅव्हलर असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

अर्थात ज्या मुलीशी तिची तुलना केली जात आहे, ती मुलगी नक्की कोण होती? तिचे नाव काय होते? याबाबत कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अलिकडेच वॉशिंग्टन विद्यापीठाने आपल्या फोटो संग्रहालयातील काही जुने फोटो प्रकाशित केले. त्यावेळी सर्वात प्रथम त्या मुलीचा फोटो समोर आला.

काय म्हणत आहेत नेटकरी?