देशभरात करोना व्हायरसची लागण होणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच अनेक अफवाही पसरतायेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लॉकडाउनबाबतचा एक मेसेज व्हायरल होतोय. ’15 जूनपासून देशभरात पुन्हा संपूर्ण लॉकडाउन लागू केलं जाणार आहे’, असा हा मेसेज आहे.

काय आहे व्हायरल मेसेज? :-
या मेसेजमुळे अनेकजण संभ्रमात आहेत. ज्यांनी ट्रेन आणि विमानांची तिकीटं बुक केली आहेत ते देखील या मेसेजमुळे त्रस्त आहेत. कारण, ट्रेन आणि हवाई वाहतूक बंद होणार असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. एका वृत्त वाहिनीच्या नावाचा वापर करुन ’15 जून के बाद फिर से हो सकता है संपूर्ण लॉकडाउन. गृह मंत्रालय ने दिये संकेत, ट्रेन और हवाई सफर पर लगेगा. ब्रेक कोरोना की बढ़ती रफ्तार के बाद लिया गया फैसला ‘ अशाप्रकारचा मेसेज व्हायरल होत आहे.


काय आहे सत्य? :-
पण, हा मेसेज खोटा आहे. प्रेस इंफॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) हा मेसेज ‘फेक’ असल्याचं स्पष्ट केलं आहे. पीआयबीने ट्विटरद्वारे हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं असून अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या फोटोंपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे 15 जूनपासून देशात पुन्हा लॉकडाउन लागू होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.