27 January 2021

News Flash

घर नव्हे राजमहाल जणू… पाहा इशा अंबानी-आनंद पिरामल यांच्या घराचे फोटो

इशा-आनंदचं हे आलिशान घर पाहून तुमचेही डोळे चक्रावतील. ५० हजार स्क्वेअर फूट परिसरातील या घराची किंमत सुमारे ४५० कोटी रुपये इतकी आहे.

गतवर्षी १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी शाही विवाहसोहळा पार पडला. पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी इशाने लग्नगाठ बांधली. या भव्य विवाहसोहळ्याला बॉलिवूडच्याही कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर आता इशा व आनंद आपल्या नव्या घरी राहायला गेले आहेत. ‘गुलिटा’ हे घर आनंदच्या आई-वडिलांनी मुलाला लग्नाचे गिफ्ट म्हणून दिले आहे. ५० हजार स्क्वेअर फूट परिसरातील या घराची किंमत सुमारे ४५० कोटी रुपये इतकी आहे.

इशा-आनंदचं हे आलिशान घर पाहून तुमचेही डोळे चक्रावतील. त्यांचं हे पाचमजली घर सी फेसिंग आहे. समुद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या घरात सर्व सोईसुविधा आहेत. डायमंड थीमवर आधारित बंगल्यानंतर एक खास डायमंड रूम बनवण्यात आला आहे. एक स्विमिंग पूल, एक देवघर, तीन तळाचे बेसमेंट पार्किंग आणि इतर सुविधाही आहेत.

लाऊंज एरिया आणि ड्रेसिंग रूमसह नोकरांना राहण्यासाठी रुम्सही देण्यात आले आहेत. प्रत्येक मजल्यावर ही नोकरांसाठी क्वार्टर देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर इशा-आनंदच्या या आलिशान घराचीच चर्चा सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 6:06 pm

Web Title: isha ambani and anand piramal house gulita is no less than a dreamland ssv 92
Next Stories
1 VIDEO: इम्रान खान यांनी दिलेल्या आश्वासनांची पाकिस्तानी खासदाराकडून पोलखोल
2 Video : विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट चेंडू? एका बॉलने कांगारूंसाठी उघडले सेमीफायनलचे दरवाजे
3 वर्षाला कचोरीवाला कमवतो 60 लाख, कमाई पाहून आयकर खात्याला आली जाग अन्…
Just Now!
X