News Flash

Video : इशा अंबानीच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का ?

पत्रिकेवर इशा आणि आनंद यांच्या नावाचं पहिलं अक्षर 'ia' असं लिहीलं आहे.

इशा अंबानी-आनंद पिरामल

उद्योगविश्वातलं नावाजलेलं नाव म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीची चर्चा ही कायमच होत असते. मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांची मुलगी इशा अंबानी हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. नुकतीच तिच्या लग्नाची तारीख ठरली असून आता लग्नपत्रिकाही समोर आली आहे.

येत्या १२ डिसेंबर २०१८ रोजी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील आलिशान निवासस्थानी इशा आनंद पिरामलसोबत विवाहबद्ध होणार आहे. त्यामुळे आता इशा-आनंदच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. त्यातच आता यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली असून एका खास आणि अनोख्या शैलीमध्ये ही पत्रिका असल्याचं पाहायला मिळत आहे.

इशाची लग्नपत्रिका बॉक्स स्वरुपात तयार करण्यात आली आहे. यात दोन बॉक्स असून पहिल्या बॉक्सवर क्रीम रंगाचं एक सुरेख फुल आहे. त्याच्या बाजूला इशा आणि आनंद यांच्या नावाचं पहिलं अक्षर ‘ia’ असं लिहीलं आहे. तर दुसऱ्या बॉक्सवर लहान पेटी असून त्यात लक्ष्मी देवीची प्रतिमा आहे.

दरम्यान, लग्नापूर्वी अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांनी आप्तेष्ट आणि मित्रमंडळींसाठी एका छोटेखानी पार्टीचं आयोजन करणार आहेत. ही पार्टी उदयपूरमध्ये होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 12:29 pm

Web Title: isha ambani and anand piramal wedding royal invitation card
Next Stories
1 जिंकलंस ! ‘या’ कारणामुळे रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव
2 अभिमानास्पद ! नक्षलग्रस्त भागातील मुलगी एका दिवसासाठी झाली ऑस्ट्रेलियाची राजदूत
3 आपलं दिवाळीचं अभ्यंगस्नान सुगंधी करणाऱ्या आदिवासी महिला
Just Now!
X