News Flash

इस्त्रायल वि. पॅलेस्टाइन : सगळं कुटुंब संपलं पण आईच्या कुशीत असल्याने ५ महिन्याचं बाळ वाचलं

इस्त्रायलच्या हल्ल्यात चार मुलांसह आईचा मृत्यू

फोटो सौजन्य -AP

खरं त्याने आईच्या कुशीत असायला हवं होतं. पण, दुर्दैव असं की अवघ्या पाच महिन्यांचा उमर गाझाच्या एका रुग्णालयात उपचार घेतोय. बेडच्या बाजूला त्याचे वडील मुहम्मद अल-हदीद पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक आपल्या मुलाकडं पहात आहेत. पायाला जखम झाल्याने उमर रडत आहे. हे सर्व पाहून ‘किमान तू जिवंत आहेस, या जगात माझ्याबरोबर फक्त तूच एक आहेस,’ असं मोहम्मद शांतपणे म्हणत आहेत. हे दृश्य आहे सध्या युद्धभूमीचं रुप घेतलेल्या गाझा पट्टीतल्या एका रुग्णालयातील…!

गाझाच्या रुग्णालयात मोहम्मद अल् हदीदी आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह कुटुंबावर उद्भवलेला तो प्रसंग आठवून आठवून रडत होते. शनिवारी झालेल्या हल्ल्यात मोहम्मद अल् हदीद यांची पत्नी आणि चार मुलांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर हदीद यांनी पत्नी आणि मुलांचा शोध घ्यायला सुरूवात केली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हल्ल्यानंतरही पाच महिन्यांचा उमर त्याच्या आईच्या कुशीत होता. हल्ल्यानंतर उमर त्याच्या आईच्या हातातमध्ये सुरक्षित होता. मात्र त्याच्या आईचा मृत्यू झाला होता.

या हल्ल्यामध्ये उमरच्या एक पायाला तीन ठिकाणी लागलं आहे. मात्र त्याला या घडलेल्या प्रसंगाची कोणतीही कल्पना नाही. उमरच्या वडिलांशिवाय सगळं कुटुंब आता संपलं आहे. मोहम्मद उमरची आई आणि त्याची भावंडं देवाच्या शोधात गेल्याचे सर्वांना सांगत आहे. हदीदची पत्नी अबू हत्तब आपल्या पाच मुलांसह सुहाब, याह्या, अब्दे रहमान, ओसामा आणि उमरला घेऊन आपल्या भावाकडे गेली होती. शनिवारी रमजानच्या महिन्याचा शेवटचा उपवास होता. त्यावेळी सर्व कुटुंब रमाजनची तयारी करत होते. त्यादिवशी त्याच्या पत्नी घरी येणार होती, मात्र अबू हत्तबच्या भावाने हट्ट केल्याने ती त्याच्याकडे थांबली. रात्री इस्रायलने निर्वासितांच्या घरांवर रॉकेटस् डागली. त्या रॉकेटस् निशाण्यात सापडलं मोहम्मद घरं आणि त्याचे सर्व कुटुंब. त्यानंतर मोहम्मद त्या ठिकाणी पोहोचला. तिथे फक्त पाच महिन्याचा उमर जिवंत असल्याचे कळाले.

इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये आतापर्यंत २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५९ लहान मुलांचा समावेश आहे. इस्त्रायलने मात्र दहशदवाद्यांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. पॅलेस्टाईनने केलेल्या हल्ल्यात १० इस्त्रायली लोकांची जीव गेल्याचे इस्त्रायलने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 5:49 pm

Web Title: israel palestine whole family is gone but the 5 month old baby survived dead mother arms abn 97
Next Stories
1 रुईयावाले हळहळले, सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला तौते वादळानंतरचा हा फोटो
2 “तुम मुझे छोड के पूजा से बात करने लगे….”, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर रंगल्या लव्ह बर्ड्सच्या गप्पा
3 …आणि भाजपा खासदाराने स्वत: घासून साफ केलं करोना केंद्रामधील शौचालय
Just Now!
X