दोन वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे जीव गमावलेल्या आठ वर्षांच्या मुलाच्या स्मरणार्थ इस्त्रायलमधल्या तेल अविव शहरात सर्वात मोठा ‘लिगो टॉवर’ उभारण्यात आला आहे. या टॉवरला ‘ओमर टॉवर’असं नाव देण्यात आहे. पाच लाख लिगोच्या प्लॅस्टिक विटांपासून ही उंचच उंच प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या टॉवरची उंची ११८ फूट उंच आहे.

ओमर सयाग हा आठ वर्षांच्या मुलाचा दोन वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे मृत्यू झाला. तो ज्या शाळेत शिकायच्या तिथल्या काही शिक्षकांनी पुढाकार घेऊन लिगो टॉवर बांधला. यासाठी काही विटा कंपनीकडून देण्यात आल्या तर काही फंडातून आलेल्या पैशांतून खरेदी करण्यात आल्या. १२ डिसेंबर ते २४ डिसेंबर या काळात हा प्लॅस्टिकच्या विटा वापरून हा रंगीबेरंगी टॉवर उभारण्यात आला. हजारो लोकांनी हा टॉवर रचण्यासाठी मदत केली. या टॉवरची नोंद गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. याआधी ज्या टॉवरच्या नावावर हा रेकॉर्ड होता त्यापेक्षा ‘ओमर टॉवर’ हा ३५ इंच मोठा आहे.