News Flash

Viral : पत्नीचा वाढदिवस विसरणे ‘येथे’ कायद्याने गुन्हा

यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते

पत्नीचा वाढदिवस विसरणे म्हणजे सामोआ देशात कायद्याने गुन्हा आहे.

बायकोचा वाढदिवस विसरणे ही ब-याच नव-यांची समस्या असते. आपण वाढदिवस विसरणार मग ती रागवणार, मग तिची मनधरणी करण्यासाठी तिला महागडी आणि तिची आवडती भेटवस्तू दिली की आपल्यासाठी विषयच संपतो. साधरण बायकोचा वाढदिवस विसरल्यानंतर तिच्या रागापासून सुटका करण्यासाठी सगळ्या नव-यांना गवसलेला हा साधा, सोपा पण १०१ टक्के काम करणारा मार्ग आहे. पण तुम्ही ‘सामोआ’ देशाचे नागरिक असाल तर मात्र तुम्हाला आपल्या पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे, कारण येथे पत्नीचा वाढदिवस विसरणे म्हणजे  कायद्याने गुन्हा आहे.

वाचा : खबरदार! क्रूर हुकूमशहा किम जाँग उनला ‘लठ्ठ’ म्हणाल तर..

हावाई आणि न्यूझीलँडच्यामध्ये सामोओ हा छोटा बेटवजा देश आहे. या देशाची लोकसंख्या ही अगदी मोजकीच म्हणजे जेमतेम २ लाखांहूनही कमी आहे. पण या देशात हा विचित्र कायदा करण्यात आला आहे. आता हा कायदा करण्यामागचे कारण ऐकूनही तुम्हाला हसू येईल. वाढदिवस विसरणा-या नव-यावर रागात पत्नीकडून हल्ले झाले आहेत आणि अशा अनेक तक्रारी येथे आल्या आहेत. कदाचित हे आपल्यासारख्यांना विनोदी वाटेल पण हेच प्रमाण रोखण्यासाठी पत्नीचा वाढदिवस विसरणे येथे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे पत्नीशी पटो अगर ना पटो पण तिचा वाढदिवस तिच्या मनाप्रमाणे साजरा करणे आणि तिला भरभरून शुभेच्छा देणे बंधनकारक आहे. तेव्हा कायद्याच्या आणि जीवाच्या भयाने का होईना पती आपल्या पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवतोच.

वाचा : वृद्ध आई- वडिलांची जबाबदारी नाकरण्या-या मुलांना अशी दिली जाते शिक्षा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 11:05 am

Web Title: it is illegal to forget your wifes birthday in this country
Next Stories
1 …म्हणून ‘या’ राज्यात मोठ्या आकाराच्या भाज्या पिकतात
2 सेक्स, चॉकलेट आणि दारूपेक्षा लोकांना ‘ही’ गोष्ट अधिक प्रिय
3 सोन्याचा कमोड वापरण्यासाठी लोक तासन् तास रांगेत उभे
Just Now!
X