काही दिवसांपूर्वी ‘बीबीसी प्लॅनेट अर्थ’च्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. शेकडो सापांच्या तावडीत सापडलेली एक घोरपड हार न मानता आपली सुटका करून घेते आणि सुरक्षित ठिकाणी परतते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पण हा काही मिनिटांचा थरारपट कॅमेरात कैद करण्यामागे दोन वर्षांची अथक मेहनत आहे.

VIRAL VIDEO : रेनडिअर  पोहचवणार घरपोच पिझ्झा

a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

थरारपट कॅमेरात कैद करणा-या रिचर्ड वोलोकोंम्बे या कॅमेरामनची ‘द गार्डिअन’ या इंग्रजी वृत्तपत्राने नुकतीच मुलाखत घेतली. यात हा थरारपट कैद करण्यासाठी आपण दोन वर्षे मेहनत करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हा थरार आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्याचे दुर्मिळ भाग्य आपल्याला लाभले असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. रिचर्ड यांनी प्राण्यांवर आधारित अनेक माहितीपट बनवले आहेत. पण, अशाप्रकारचा प्रसंग आपल्या संपूर्ण करिअरमध्ये पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. बेसावध घोरपड जिथे साप राहतात अशा ठिकाणी पोहचते, आणि पापणी लवते न लवते तोच लपलेले एकापाठोपाठ एक असे शेकडो साप बिळातून बाहेर येतात आणि या घोरपडीवर हल्ला करतात. एक क्षण असाही येते की शेकडो सापांचा विळखा तिला बसतो आणि आता ही घोरपड सापांचे भक्ष्य होणार असे वाटते. पण, त्याच क्षणी ही घोरपड आपली सापाच्या विळख्यातून सुटका करून घेते आणि सुरक्षित ठिकाणी पळ काढते. असा हा काही मिनिटांचा थरारपट होता.

पण हा थरारपट कॅमेरात कैद करण्यासाठी रिचर्ड यांनी दोन वर्षे मेहनत केली. दोन वर्षांत त्यांनी गालापोगज या ठिकाणाला दोनदा भेट देली आणि एकूण ३६ दिवस त्यांनी या प्रदेशात ४०० तासांहूनही अधिक काम केले आणि या मेहनतीतून ९ मिनिटांचा व्हिडिओ त्यांनी बनवला. यातलाच काही भाग हा व्हायरल झाला होता.