24 November 2020

News Flash

सडलेल्या फळाच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना वाटलं वायूगळती झाली अन् …

सडलेल्या फळाच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये घाबरगुंडी उडली. वायूगळती झाल्याचं वाटल्यानं पोलिसांनी कॉलेजमधल्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थनी नेलं.

डुरिअन फळ दिसायला काहीसं फणसासारखंच

डुरिअन फळ दिसायला काहीसं फणसासारखंच. पण शक्यतो हे फळ खाणं अनेकजण टाळतातच. याच कारण म्हणजे त्याला येणारा उग्र वास. एक फूड ब्लॉगरनं या फळाच्या उग्र वासाचं वर्णन कांदा आणि टरपेंटाईन एकत्र केल्यावर कसा वास येईल तसाच काहीसा वास या फळाला येतो असं वर्णन केलं होतं. तर या सडलेल्या फळाच्या वासामुळे ऑस्ट्रेलियातील रॉयल मेलबर्न इन्स्टिट्यूड ऑफ टेक्नॉलिजीच्या विद्यार्थ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

कोणीतरी कॉलेजमधल्या कपाटात हे फळ ठेवलं होतं. काही दिवसांनी ते सडलं. यातून निर्माण होणारी दुर्घंधी एखाद्या वायूसारखीच होती. कदाचित कॉलेजच्या आवारात वायूगळती झाली असावी या भीतीनं विद्यार्थ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. ३ च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर व्हिक्टोरिया पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं.

कॉलेजमधल्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित स्थळी नेलं. त्यानंतर कॉलेज परिसरात कसून शोध घेण्यात आला. यावेळी वायू गळती झाली नसून सडलेल्या डुरिअन फळातून दुर्गंधी येत असल्याचं समजताच पोलिसांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला. एसीमुळे ही दुर्गंधी कदाचित कॉलेजभर पसरली असावी असं पोलिसांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 5:14 pm

Web Title: it was a rotten durian fruit but college library evacuated fearing a gas leak
Next Stories
1 प्रेरणादायी: ब्रेन टयूमरशी लढा देत तिने मिळवला ‘ब्यूटी क्वीन’चा किताब
2 Video: द्रविडच्या साधेपणावर प्रेक्षक फिदा, RCB चा प्रशिक्षक बनवण्याची मागणी
3 ब्रिटनच्या राजघराण्यात जन्मलेल्या नव्या पाहुण्याचं नाव ऐकलं का?
Just Now!
X