26 February 2021

News Flash

भन्नाट ऑफर… ‘या’ गावात शिफ्ट होणाऱ्याला दर महिन्याला मिळणार सात लाख रुपये

यासाठी कोण अर्ज करु शकतो याबद्दल काही अटी ठेवण्यात आल्यात

(फोटो ट्विटरवरुन)

जगभरातील पर्यटकांच्या सर्वात आवडत्या देशांपैकी एक म्हणजे इटली. डोंगराच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावं, सगळीकडे हिरवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात हरवून जाण्याची उत्तम संधी असणारा हा देश पर्यटकांची आवडती जागा असण्यामागे खूप सारी कारणं आहेत. मात्र याच इटलीमध्ये जाण्यासाठी लागणाऱ्या पैशांचा विचार करता अनेकांना इच्छा असूनही इटलीमध्ये भटकंती करता येत नाही. मात्र याच इटलीमध्ये तुम्हाला राहण्यासाठी पैसे देण्यास कोणी तयार आहे असं सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र खरोखरच येथील एका छोट्याश्या गावाने अशी एक खास ऑफर दिलीय. इटलीतील सॅण्टो सेटफॅनो दी सेसिनियो या गावामध्ये एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना दर महिन्याला जवळजवळ सात लाख रुपये दिले जाणार आहेत.

(फोटो ट्विटरवरुन)

या गावाची लोकसंख्या केवळ ११५ इतकी आहे. त्यापैकी १३ जण हे २० वर्षांचे आहेत. तर ४१ जण हे ६५ किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यामुळेच गावातील लोकसंख्येची घनता आणि संख्या पाहता गावाचा निरंतर विकास होण्यासाठी गावातील पंचायतीने ही योजना आखली आहे. गावातील शंभरच्या आसपास असणारी लोकसंख्या आणि त्यातही वयस्कर लोकांचे प्रमाण पाहता गावाचे नाव नामशेष होऊन येथे कोणी नव्हतचं अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गावामध्ये नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी गावाकडून निधी दिला जाणार आहे. या गावातील प्रमुख असणाऱ्या फॅबो सॅण्टाव्हिका यांनी यासंदर्भात सीएनएन ट्रॅव्हलला माहिती दिली. “आम्ही कोणालाही काहीही विकत नाहीय. किंवा हा काही व्यवहारही नाहीय. आम्ही फक्त आमचं गाव जगावं यासाठी प्रयत्न करत आहोत,” असं फॅबो म्हणाले.

गावात राहायला येणाऱ्यांना काही जमीन दिली जाईल याच्या माध्यमातून त्यांना कमाईचे साधन उपलब्ध होईल. त्याप्रमाणे किमान तीन वर्षांसाठी दर महिन्याला आठ हजार युरो (आताच्या दराप्रमाणे सहा लाख ९३ हजार भारतीय रुपये) दिले जातील. त्याच प्रमाणे गावातील काऊन्सील म्हणजेच पंचायतीकडून गावामध्ये उद्योग सुरु करण्यासाठी २० हजार युरोही देण्यात येतील. गावाकडून तीन वर्षांमध्ये दोन लाख ८८ हजार युरोंची मदत केली जाईल.

(फोटो ट्विटरवरुन)

मात्र या गावामध्ये राहणाऱ्यांना भाडंही द्यावं लागणार आहे. विशेष म्हणजे हे भाडं पैशांच्या रुपात नसून काहीतरी प्रतिकात्मक असेल. मात्र प्रतिकात्मक भाडं म्हणजे काय हे अद्याप गावकऱ्यांनी ठरवलेलं नाही. त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. बरं हे सर्व केवळ इटलीमध्ये राहणाऱ्यांसाठी लागू होणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती इटलीत राहणारी आणि ४० किंवा त्यापेक्षा कमी वयाची असणं बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या पद्धतीच्या उद्योगांना गावामध्ये परवानगी आहे याची यादीही जाहीर करण्यात आली असून यामध्ये वाटाडे, माहिती अधिकारी, व्यवस्थापकीय काम, औषधांची दुकाने तसेच स्थानिकांनी पिकवलेला माल विकण्याची तयारी असणाऱ्यांसाठी ही ऑफर देण्यात आलीय.

१५ ऑक्टोबरपासून या योजनेअंतर्गत गावाने अर्ज मावले असून आतापर्यंत दीड हजार जणांनी यासाठी अर्ज केला आहे. गावकरी यापैकी १० किंवा पाच अर्ज बाजूला काढून त्यापैकी सर्वोत्तम अर्ज निवडतील. मात्र अद्याप या योजनेअंतर्गत अर्ज येणं सुरु असून सर्व अर्ज आल्यानंतरच अंतिम निवड प्रक्रिया केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 4:19 pm

Web Title: italian village will pay 8000 euro per month to anyone who agrees to move there scsg 91
Next Stories
1 बॉडीबिल्डर नाही रोजंदारीवर काम करणारा मजूर… त्याचे पिळदार शरीर पाहून सारेच झाले आश्चर्यचकित
2 सारा तेंडुलकरने बनवली खास डिश; ‘या’ क्रिकेटपटूने केली कमेंट
3 जाणून घ्या No Shave November ही भानगड नक्की आहे तरी काय
Just Now!
X