News Flash

इव्हांका ट्रम्प यांनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो, भारत-अमेरिका ‘घनिष्ठ मैत्री’चा केला उल्लेख

फोटो शेअर करताना इव्हांका यांनी दोन्ही देशांमधील घनिष्ठ मैत्रीबाबत उल्लेख केला..

इव्हांका ट्रम्प यांनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो, भारत-अमेरिका ‘घनिष्ठ मैत्री’चा केला उल्लेख

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्पने मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेले फोटो ट्रम्प यांच्या तीन वर्षांपूर्वीच्या भारत दौऱ्यातील आहेत. फोटो शेअर करताना इव्हांका यांनी दोन्ही देशांमधील घनिष्ठ मैत्रीबाबत उल्लेख केलाय.

इव्हांका ट्रम्प यांनी फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये, “जोपर्यंत जगाची करोनाविरोधात लढाई सुरू आहे, तोपर्यंत जागतिक सुरक्षा, स्थिरता आणि आर्थिक उन्नती कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांमधील घनिष्ठ मैत्री अजून महत्त्वाची झाली आहे” असं नमूद केलंय.

इव्हांका यांनी शेअर केलेले फोटो हैदराबादमध्ये झालेल्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेतील आहेत. नोव्हेंबर २०१७ मध्ये अमेरिकेच्या ३५० प्रथिनिधिंसोबत इव्हांकाने या परिषदेत सहभाग घेतला होता. या भारत दौऱ्यात इव्हांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही कौतुक केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ivanka Trump (@ivankatrump)


दरम्यान, भारत आणि अमेरिकेत चांगले मुत्सद्दी संबंध आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबियांसह भारतात आले होते. तर, करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्येही दोन्ही देशांचं नाव आघाडीवर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 12:53 pm

Web Title: ivanka trump shares photos with pm modi from india visit sas 89
Next Stories
1 मुंबई : १० रुपये भाड्याने पुस्तकं देणाऱ्या व्यक्तीने शिकवला जीवनाचा ‘धडा’, IAS ने शेअर केली ‘बोलकी’ पोस्ट
2 अन्नासाठी आपण शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून आहोत, म्हणणाऱ्याला Swiggy चं भन्नाट उत्तर
3 मुंबई : लॉकडाऊनआधी होता 7 Star हॉटेलचा शेफ, आता स्टॉल लावून विकतोय बिर्याणी !
Just Now!
X