आपल्या घरात असणा-या प्रत्येक वस्तूशी आपले भावनिक बंध जोडलेले असतात नाही का? बाबांनी दिलेले घड्याळ, लग्नात माहेरून आणलेली तांब्याची भांडी, जुने सागवानी कपाट अशा शेकडो वस्तू असतील जिच्याशी आपली एक इमोशनल अटॅचमेंट जोडलेली असते. त्या वस्तू कितीही जून्या झाल्या, तुटल्या तरी आपल्याला त्या फेकून द्याव्याश्या वाटत नाही. का कोण जाणे ?कदाचित त्या वस्तूशी असलेली ती इमोशनल अटॅचमेंटच आपल्याला रोखत असेल. आता हेच बघना जगजीत सिंह यांचीही आपल्या मारुती ८०० शी अशीच इमोशनल अटॅचमेंट होती.

वाचा : ओळखलंत का सर मला?

मारुती ८०० जुने मॉडेल कंपनीने केव्हाच ग्राहकाकडून परत घेतले आता या गाड्या जाऊन दुस-या गाड्याही आल्या. फार क्वचितच कोणाकडे अशी गाडी दिसेल. जगजीत सिंह यांचीही पहिलीच गाडी होती. पण तिच्याशी जोडलेली इमोशनल अटॅचमेंट त्यांना काही सोडता येईना म्हणूनच या पठ्ठ्याने तीन वर्ष या गाडीवर मेहनत घेत तिला असे काही बदलले की सगळ्यांना आता या गाडीचा हेवा वाटू लागला तर नवल वाटायला नको.

वाचा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..

जगजीत हे दिल्लीतले व्यवसायिक. त्यांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय आहे. आतापर्यंत त्यांनी कितीतरी गाड्यांचे रुप पालटलं आहे. गाड्या मॉडीफाय करुन घेण्याचा सध्या ट्रेंड आहे. जगजीत यांनी आतापर्यंत त्यांच्या ग्राहकांच्या १७० हून अधिक गाड्या मॉडीफाय केल्या असतील. त्यांनी सुरुवातीला मारुती ८०० घेतली होती. जर आपण दुस-यांच्या गाड्या मॉडिफाय करु शकतो तर आपली गाडी का नाही? असा विचार त्यांच्या डोक्यात आला. जुनी गाडी भंगारमध्ये विकण्यापेक्षा त्यांनी या गाडीवर काम करायला सुरूवात केली आणि चार वर्षात तिचे रुपडे असे काही पालटले की ही जुनी मारुती ८०० होती यावर कोणाचा सांगूनही विश्वास बसणार नाही. जगजीत यांनी बनवलेली ही गाडी जेव्हा दिल्लीच्या रस्त्यावरून धावते तेव्हा सगळ्यांच्या नजरा या गाडीवर खिळतात. सध्या सोशल मीडियावर तरुणांमध्ये त्यांची हीच लाल गाडी चर्चेचा विषय बनली आहे.