News Flash

आलिशान गाडीच्या नेमप्लेटसाठी व्यावसायिकानं खर्च केले तब्बल १६ लाख

जयपूरमधल्या एका व्यावसायिकानं आवडीची नंबर प्लेट खरेदी करण्यासाठी तब्बल १६ लाख रुपये मोजले आहेत. मला नेहमीच नंबर वन राहायला आवडतं, असं ते म्हणतात.

प्रातिनिधीक छायाचित्र

जयपूरमधल्या एका व्यावसायिकानं आवडीची नंबर प्लेट खरेदी करण्यासाठी तब्बल १६ लाख रुपये मोजले आहेत. ३७ वर्षीय राहुल तनेजा हे व्यावसायिक आहेत. ०००१ हा आकडा आपल्या नंबर प्लेटमध्ये असावा यासाठी त्यांनी नुकतीच एवढी मोठी रक्कम मोजली आहे. जाग्वार कारसाठी सर्वाधिक बोली लावून त्यांनी ही नेमप्लेट खरेदी केली आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करून नंबर प्लेट विकत घेण्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना असेल.

बापरे ! एका नंबर प्लेटची किंमत १३२ कोटी

मला नेहमीच नंबर वन राहायला आवडतं. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही आघाडीवरच असलं पाहिजे या मताचा मी आहे. एक आकडा मला खूपच आवडतो. माझ्या प्रत्येक गाडीचा शेवटचा क्रमांक ०००१ आहे असं राहुल हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. यापूर्वी दुबईतल्या एका भारतीय व्यापाऱ्यानं तब्बल १ कोटी खर्च करुन नंबर प्लेट खरेदी केली होती. राहुल हे आधी मॉडेलिंग करायचे त्यानंतर त्यांनी स्वत:ची इव्हेंट मेनेजमेंट कंपनी सुरू केली.

मी रस्त्यावर पतंग, रंग, राख्या, फटाके विकायचो. इतकंच नाही तर रात्री रिक्षा चालवून उदरनिर्वाहही करायचो असंही राहुल म्हणाले. राहुल यांच्याकडे जाग्वारशिवाय आणखी काही आलिशान गाड्या आहेत ज्यांच्या नंबरप्लेटमध्ये ०००१ हा आकडा आहे यासाठी त्यांनी सर्वाधिक खर्च पूर्वी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 5:52 pm

Web Title: jaipur businessman bids rs 16 lakh for number plates
Next Stories
1 आता एका क्लिकवर बदलता येणार कपड्यांचा रंग!
2 बॅंकेत पैसे ट्रान्सफर करणं झालं सोपं, पेटीएमचं नवं फिचर
3 एअरटेलकडून अनलिमिटेड इंटरनेटचं गिफ्ट , जिओपेक्षा स्पीडही दुप्पट
Just Now!
X