आपल्याकडे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे आहेत तेच समजत नाही. हे रस्ते कितीतरी वेळा बुजवले जातात आणि दुस-याच दिवशी हे खड्डे पुन्हा दिसतात इतकी वाईट परिस्थिती आपल्याकडे आहे. त्यामुळे रस्ते बुजवण्याचा अभिनय करणा-या  सगळ्यांनीच जपानचा इंजिनिअर्सकडून शिकायला हवे. आपल्याकडे वर्षांनूवर्षे रस्त्यातले खड्डे बुजत नाहीत पण जपानमधल्या फूकुओका शहरातील १०० फूट खड्डा फक्त ७ दिवसांत बुजवून रस्ता पूर्ववत करण्यात आला. फूकुओका शहरात वाहतूकीच्या रस्त्यातच १०० फूट खड्डा पडला होता. त्यामुळे नागरिकांना अनेक असुविधांचा समाना करावा लागत होता. नागिरकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी जपान सरकारने फक्त सात दिवसांत १०० फूट खड्डा बुजवला आहे. यासाठी कामगारांनी २४ तास दिवस रात्र मेहनत केली आहे. या मोठ्या खड्ड्यामुळे या रस्त्याखालून जाणा-या गॅस, पाण्याच्या पाईपलाईनचेही मोठे नुकसान झाले होते त्यामुळे कामगारांनी या पाईप लाईन दुरुस्त करत  हा खड्डा बुजवला आहे. जपानी लोकांच्या या तंत्रज्ञानाने जगभरातील इंजिनिअर्सना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पण गेल्या ७ दिवसांत नागरिकांना झालेल्या गैरसोयीसाठी देखील जपानच्या मेअरने माफी मागितली आहे.