भारतीय संस्कृती आणि परंपरा यांनी प्रभावित होऊन एका जपानी जोडप्यानं खास भारतीय पद्धतीनं तामिळनाडूत लग्नगाठ बांधली. नुकताच त्यांचा विवाह पार पडला. लग्नासाठी ते खास भारतात आले होते. भारतीय पेहराव आणि दागदागिने घालून नटलेल्या या जोडप्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल
चिहारू चार वर्षांपूर्वी एका संशोधनाच्या कामासाठी तामिळनाडूत आली होती. तामिळनाडूच्या वास्तव्यात इथल्या संस्कृतीनं ती पूर्णपणे प्रभावित झाली. भारतीय संस्कृती आणि इथल्या परंपरांविषयी तिला ओढ वाटू लागली. इथला लग्नसोहळा, विधी, लग्नमंडपातली फुलांची रंगीबेरंगी सजावट, लज्जदार जेवण, भरजरी कपडे, दागदागिने हा थाट तिला इतका भावला की लग्न करायचं तर भारतीय पद्धतीनं हे तिनं मनाशी अगदी पक्क करून टाकलं. संशोधनाचं काम पूर्ण झाल्यानंतर ती जपानला परतली. ‘द हिंदू’नं दिलेल्या माहितीनुसार चिहारू ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ती अस्खलित तमिळदेखील बोलते.
अधुरी एक कहाणी! मृत्यूच्या काही तास आधी ‘ती’ अडकली विवाहबंधनात
चिहारू आणि ओबाटा खास लग्नासाठी टोकियोवरून मदुराईला आले. रविवारी तमिळ पद्धतीनं या दोघांचा विवाह पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्याला काही मोजके लोक उपस्थित होते. दोघंही भारतीय नववधु-वरासारखे तयार झाले होते. चिहारूच्या तमिळ मित्रमैत्रिणींनी लग्नासाठी त्यांना मदत केली. लग्नाच्या एकूण एक विधी भारतीय पद्धतीनं पार पडल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2018 2:01 pm