‘हे घे गुलाबाचं फूल.. माझ्याकडून तुला सप्रेम भेट’
‘हे फक्त फूल आहे अस् अजिबात मानू नकोस. कारण ते माझ्या प्रेमाचे प्रतिक आहे.’
आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा पत्नीला फूल देत प्रत्येक प्रियकर किंवा पती अशीच काहीशी वाक्य बोलत असतो. थोडक्यात काय तर तिला फूलं आवडतात म्हणून एक तर कोणीतरी तोडलेली फूलं विकत घेऊन तिला घ्यायची किंवा कुंडीतलं फूल तोडून तिच्या केसांत माळायचं असंच सगळे आतापर्यंत करत आलेयत. पण तिला फूलं आवडतात म्हणून किती जणांनी आपल्या बागेत, घराच्या कुंडीत खूप फुलझाडं लावली आहेत? फार कमी जण असतील. पण दोघांमध्ये प्रेम फुलवायचे असेल तर तिच्या आवडीचं काहीतरी करायला नको का? व्हॅलंटाइन डे निमित्ताने जपानच्या एका जोडप्याची कथा व्हायरल होत आहे. आपल्या अंध पत्नीसाठी दोन वर्ष मेहनत करून या पतीने घराभोवती फुलबाग फुलवली आहे.

फॅशन डिझायनिंगमधले करिअर सोडून ‘ती’ दाखल झाली पोलीस दलात

कुरोकी दाम्पत्य जपानच्या शिंतोमी भागात राहत आहे. गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. पण एक दिवस कुरोकी यांच्या पत्नीची दृष्टी गेली, पण आणि जीवनातला सारा आनंद संपला असंच त्यांना वाटू लागलं. पण आपल्या लाडक्या पत्नीसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून दोन वर्ष मेहनत घेत त्यांनी आपल्या घराभोवतीच्या परिसरात फुलंझाडं लावायला सुरूवात केली. बघता बघाता ही बाग मोठी झाली. त्यांच्या पत्नीला गुलाबी रंगाची फुलं आणि त्याचा सुवास खूपच आवडायचा, कुरोकी यांनी आपल्या बागेत दूर दूरपर्यंत ही फूलं लावली. वसंत ऋतूत फुलांच्या गुलाबी रंगात हा परिसर न्हाऊन निघतो. या फुलांचा मंद मंद सुवास वा-यासोबत आजूबाजूच्या परिसरात पसरतो. आपल्या अंध पत्नीसाठी कुरोकी यांनी घराभोवती बाग फुलवली. दरवर्षी गुलाबी फुलांनी बहरलेली ही बाग पाहण्यासाठी येथे हजारो लोक येतात.

VIRAL VIDEO : हॉरर मूव्ही सुरु असताना टीव्हीतून बाहेर आले भूत