News Flash

सामान्य मुलाशी लग्नासाठी जपानच्या राजकन्येकडून पदत्याग!

राजकुमारी आणि कामगाराची अनोखी प्रेम कहाणी

जपानची राजकन्या माको (छाया सौजन्य : AP)

प्रेमात असलेली माणसं एकमेकांसाठी काहीही करायला तयार होतात. आता हेच बघाना जपानच्या शाही घराणातल्या राजकन्येने एका सामान्य तरुणासोबत लग्न करण्यासाठी आपल्या पदाचा त्याग केला. प्रेमापेक्षा जगात दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नसते आणि प्रेम हे कधी माणसांचा पैसा थाटमाट बघून करायचं नसतं हे या तरूण राजकन्यने दाखवून दिलं. २५ वर्षांची राजकुमारी माको ही जपानचे सम्राट अकिहितो यांची नात. जपानमध्ये या राजघराण्याला मोठा मान आहे. आता ही तरूण राजकुमारी तिच्या धाडसी निर्णयामुळे जगभरात चर्चेचा विषय बनली.

माकोने इथल्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी विवाह करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. माकोचा होणारा पती केई कोमूरो हॉटेलमध्ये सागरी पर्यटन विभागात काम करतो. पाच वर्षांपूर्वी राजकुमारी माको त्याला भेटली होती आणि त्याचक्षणी त्याच्या प्रेमात पडली. हे दोघंही टोकियोतल्या एका कॉलेजमध्ये शिकायचे. राजकुमारीने आपला निर्णय राजा राणीला सांगितला, यासाठी तिला त्यांची अधिकृत परवानगीही घ्यावी लागली. जपानच्या राजघराण्यात एक नियम आहे. राजघराण्यातील व्यक्तीला सामान्य माणसांबरोबर लग्न करायचे असेल तर ती भविष्यात राजघराण्याची सदस्य राहत नाही. ती एक सामान्य नागरिक होते.

राजकुमारीलादेखील याची पूर्वकल्पना देण्यात आली, पण तरीही ऐशोआराम आणि अलिशान महालात न रमता तिने एका सामान्य माणसासारखं जीवन व्यतित करण्याचा निर्णय मनाशी पक्का केला. या विवाहासाठी तिला शाही घराण्यातून मान्यता मिळाली. त्यामुळे विवाहबंधनात अडकल्यावर राजकुमारी माको राजकुमारी न राहता एक सामान्य नागरिक होणार आहे. आतापर्यंत राजकुमारी आणि तिच्या प्रेमात पडलेला सामान्य मुलगा अशा गोष्टी अनेकदा आपण गोष्टीच्या पुस्तकात वाचत आलोत. या गोष्टींचा शेवट नेहमीच वाईट होतो. ती राजकुमारी तिला किती बंधनं, अलिशान महालात राहणारी परीच ती, झोपडीत थोडीच राहणार? अशा प्रकारच्या गोष्टी अनेकदा वाचतो. पण या राजकन्येने मात्र ही गोष्ट पूर्णपणे बदलली आणि जगात प्रेमापेक्षा पद, पैसा महत्त्वाचा नसतो, हे दाखवून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 12:35 pm

Web Title: japanese princess mako gives up her status to marry common man
Next Stories
1 Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनात १२ महिने फळं देणारं आंब्याचं झाड
2 Viral Video : जंगलात सर्वात ताकदवान कोण सिंह की मगर?
3 सोळा वर्षांच्या मुलाने काश्मिरी लोकांसाठी बनवलं ‘काशबुक’
Just Now!
X