News Flash

बाहुली की मुलगी? तिच्या अप्रतिम सौंदर्यानं सगळ्यांनाच पाडलं कोड्यात

हे फोटो इतके प्रसिद्ध झाले की ही बाहुली नसून ती पाच वर्षांची मुलगी आहे यावर विश्वास ठेवणंही अनेकांना अवघड जात होतं.

बाहुली की मुलगी? तिच्या अप्रतिम सौंदर्यानं सगळ्यांनाच पाडलं कोड्यात
निळे डोळे, कुरळ्या केसांच्या जाराच्या सौंदर्याची भुरळ छायाचित्रकार मोफे बामुइवावर पडली.

अवघ्या पाच वर्षांची ही चिमुकली आज सोशल मीडियावरची राणी झाली आहे. तिच्या अप्रतिम सौंदर्यानं तिनं सर्वांनाच भुरळ घातली आहे. पाहताचक्षणी ही बाहुली आहे की मुलगी असा प्रश्न पडावा असं रुप जिला लाभलं तिच्याबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना होतं.

या मुलींचं नवा जारे इजालाना. ती मुळची नायजेरियाची. निळे डोळे, कुरळ्या केसांच्या जाराच्या सौंदर्याची भुरळ छायाचित्रकार मोफे बामुइवावर पडली. जारेचे काही फोटो त्यानं टीपले. मोफेनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. बघता बघता हे फोटो इतके प्रसिद्ध झाले की ही बाहुली नसून ती पाच वर्षांची मुलगी आहे यावर विश्वास ठेवणंही अनेकांना अवघड जात होतं.

ती लहान आहे पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव एका मोठ्या व्यक्तीसारखे आहेत. ती मला एका शक्तीशाली स्त्रीसारखी भासली अशा शब्दात त्यानं तिच्या अप्रतिम सौंदर्याचं कौतुक केलं आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2018 12:30 pm

Web Title: jare ijalana from nigeria dubbed as the world most beautiful girl
Next Stories
1 टॉम क्रूज होऊ नका; हेल्मेट न घालणाऱ्या तरुणांना मुंबई पोलिसांनी दिला संदेश
2 इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘किकी चॅलेंज’ला पोलिसांचा विरोध, कारण…
3 सिग्नलवर भीकेऐवजी मागितली नोकरी, मिळाल्या २०० ऑफर
Just Now!
X