22 January 2021

News Flash

जसप्रीत बुमराहने उडवली स्टिव्ह स्मिथची खिल्ली, व्हिडिओ झाला व्हायरल

बुमराहच्या जवळ उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजलाही नाही आवरलं हसू

भारत आणि ऑस्ट्रेलियात तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये सुरू आहे. पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण ९० षटकांचा खेळ झाला नाही. केवळ ५५ षटकांचा खेळ झाला आणि ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून १६६ धावा बनवल्या होत्या. पावसामुळे ३५ षटकांचा खेळ होऊ शकला नाही. दरम्यान, सध्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झालीये. पण सामन्याच्या पहिल्या दिवशी घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथची नक्कल करताना दिसला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. स्मिथ फलंदाजी करताना एखादा फटका मारल्यावर जी कृती करतो त्याची बुमराह नक्कल करताना या व्हिडिओत दिसतंय. बुमराहच्या गोलंदाजीवर स्मिथने एक बचावात्मक फटका खेळला होता. त्यानंतर सवयीप्रमाणे त्याने आपले दोन्ही खांदे उडवले. स्मिथची ही कृती पाहून बुमराहला राहवलं नाही. पुढचा चेंडू टाकण्यासाठी मागे फिरताना त्याने खांदे उडवत स्मिथची नक्कल केली. यावेळी बुमराहच्या जवळ उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजला हसू आवरलं नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्यावेळी इशांत शर्मानेही स्मिथची नक्कल उडवली होती. तो व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला होता. बघा व्हिडिओ :


स्मिथची शतकी खेळी :
दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरलेल्या स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली आहे. सप्टेंबर २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथनं लगावलेलं हे पहिलेच शतक आहे. २०० चेंडूचा सामना करताना स्मिथनं शतकी खेळी केली. जाडेजानं मारलेल्या अचूक थ्रोमुळे स्मिथचा डाव संपुष्टात आला. स्मिथचं कसोटीमधील हे २७ वं शतक आहे. एका बाजूनं विकेट पडत असताना स्मिथनं एकट्यानं खिंड लढवली. दुसऱ्या दिवशी एका बाजूनं विकेट पडत असताना स्मिथनं पहिल्यांदा ११६ चेंडूत सात चौकारांच्या मदतीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर २०० व्या चेंडूवर १४ चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. जवळपास दीड वर्षानंतर स्मिथनं कसोटीत शतक झळाकवलं आहे. याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये इंग्लंडविरोधात २११ धावांची खेळी केली होती. त्यानंतर स्मिथला एकही शतकी खेळी करता आली नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 12:29 pm

Web Title: jasprit bumrah hilariously imitates steve smith on his follow through video goes viral sas 89
Next Stories
1 प्रेरणादायी! ६२ वर्षीय महिलेनं दूधविक्रीतून वर्षभरात कमावले एक कोटी १० लाख रुपये
2 …म्हणून त्याने एकाच मंडपात दोन्ही गर्लफ्रेण्ड्ससोबत एकाच वेळी केलं लग्न; ५०० वऱ्हाड्यांनी लावली हजेरी
3 Viral Video : अमेरिकन संसदेत हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांच्या गर्दीत दिसला भारताचा झेंडा
Just Now!
X