News Flash

अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या ‘अॅमेझॉन’मध्ये मिटिंग कशी होते माहितीये?

इथे नेहमीच वेगळं चित्र असतं. मिंटिंग होणार म्हटल्यावर सगळेच कर्मचारी विशेष तयारीनिशी येतात. दोनदिवस आधीपासून महत्त्वाच्या मुद्द्यावर पॉवर पाईंट प्रेझेन्टेशन तयार करतात.

अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (संग्रहित छायाचित्र)

जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक. अर्थात जेफ यांची काम करण्याची आणि विचार करण्याची पद्धतही सगळ्यात हटके. तर नुकतंच त्यांना अॅमेझॉनमध्ये मिटिंग कशी पार पडली जाते? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते थक्क करणारं होतं.

वाचा : चालकाच्या सेवानिवृत्तीदिवशी जिल्हाधिकारीच झाले ‘सारथी’, दिली अनोखी भेट

आता मिंटिंग होणार म्हटल्यावर सगळेच कर्मचारी विशेष तयारीनीशी येतात. दोनदिवस आधीपासून महत्त्वाच्या मुद्द्यावर पॉवर पाईंट प्रेझेन्टेशन तयार करतात. मग सगळ्यांसमोर प्रेझेन्टेशन देतात. पण अॅमेझॉनचे कर्मचारी यापैकी काहीही करत नाही. इथल्या वरिष्ठांना मिटिंगमध्ये चर्चीले जाणारे महत्त्वाचे मुद्दे कागदावर लिहून आणणं बंधनकारक असतं. सहा पानांचा हा अहवाल शांततेच वाचला जातो असं जेफ हे एका मुलाखतीत म्हणाले.

वाचा : …म्हणून व्हॉटसअॅपच्या सहसंस्थापकाने दिला फेसबुकच्या पदाचा राजीनामा

अॅमेझॉनची ही विचित्र मिटिंग नेहमीच चर्चेचा विषय ठरते. इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना शाळेत असल्यासारखं वाटतं. पॉवर पॉईंटवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येकजण अगदी व्यवस्थितरित्या जे काही चर्चिले जाणार आहे त्याची मुद्देसूद मांडणी सहा पानांत करतो. प्रत्येकजण लक्षपूर्वक त्यात सहभागी होतो असं बेझॉस म्हणाले. म्हणूनच अॅमेझॉनच्या या हटके मिटिंगबद्दल नेहमीच चर्चा असते असंही बेझॉस अभिमानानं म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:26 pm

Web Title: jeff bezos amazon weirdest meeting culture will blow your mind
Next Stories
1 चालकाच्या सेवानिवृत्तीदिवशी जिल्हाधिकारीच झाले ‘सारथी’, दिली अनोखी भेट
2 चेन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक सामन्यात दिसणाऱ्या ‘मिस्ट्री गर्ल’चा पत्ता अखेर सापडला
3 नशीबी ना मरण, ना जगणं! हरणांची वाईट अवस्था करणाऱ्या शिकाऱ्यावर १ लाखांचं बक्षीस
Just Now!
X