News Flash

Swiggy ने विचारलं, ‘जेवलीस का?’; उद्धव ठाकरेंच्या फोटोपासून आई काय म्हणालीपर्यंत मराठी पोरा-पोरींनी दिले भन्नाट रिप्लाय

आजच्या सोशल मिडियाच्या युगात आय लव्ह यू वगैरे फार ओल्ड स्कूल वाटतं. त्यामुळेच सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘जेवलीस का?’चा आधार घेतला जातो.

स्विगीने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन जेवलीस का असा प्रश्न ट्विट केला अन् नेटकऱ्यांनी भन्नाट रिप्लाय केलेत. (मूळ फोटो पीटीआयवरुन साभार)

इंग्रजीमधील ते तीन प्रेमळ शब्द म्हणजेच आय लव्ह यू असे असले तरी मराठीमध्ये हे फारसं मनाला भिडणारं नसल्याचं मानलं जातं. त्यातच आजच्या सोशल मिडियाच्या युगामध्ये आय लव्ह यू वगैरे फार ओल्ड स्कूल त्यापेक्षा कंटाळवाणं वाटतं. त्यामुळेच सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘जेवलीस का?’ या शब्दांचा आधार घेतला जातोय. अर्थात तरुणाईला याचा अंदाज असेल कारण अनेक मिम पेजेसवर या ‘जेवलीस का?’संदर्भातील अनेक मिम्स त्यांनी पाहिली असतील. पण ज्यांना यासंदर्भात ठाऊक नाही त्यांना अगदी सोप्य शब्दात सांगायंच झालं तर ‘जेवलीस का?’चा अर्थ तुझ्यात मन अडकलं आहे असं घेतला जातोय. म्हणजे पाठवणाऱ्यालाही ते समजतं आणि ज्याला पाठवला जातोय त्यालाही. हे शब्द जेवणाऐवजी जीवनाशी निगडीत झालेत. सोशल मिडियावर या ‘जेवलीस का?’ची तुफान चर्चाय. हल्ली तुझ्यामध्ये इन्ट्रेस्टेड आहे यासाठी किंवा पहिल्यांदा संभाषणाला सुरुवात करताना दोन्हीकडून हाय झाल्यानंतर मुलाकडून विचारला जाणारा पुढचा प्रश्न हा ‘जेवलीस का?’ असतो. यावरुन अनेक मिम्सही व्हायरल झालेत. आता मराठी तरुणाईच्या याच नव्या प्रेमवाक्याचा आधारा स्वीगीने आपल्या प्रमोशनसाठी घेतलाय.

स्वीगी या फूड होम डिलेव्हरी अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ‘जेवलीस का?’ हा असा प्रश्न विचारला आहे.

बरं हा प्रश्न कोणाला टॅग करुन विचारलेला नाही. त्यामुळेच ज्याला जसं वाटेल ती उत्तरं स्विगीच्या या प्रश्नावर दिली जात आहेत. पाहुयात कोणी काय उत्तरं दिली आहेत.

१) हो जेवले आणि भांडी पण घासून झाली

२) मी पण हेच विचारलं होत तिला पण…

३) जेवलीस का? विचारलेय, जेवलास का? नाही.

४) नसशील जेवली तर घे वडापाव…

५) उपाशीच असणार…

६) झोमॅटोवरुन ऑर्डर केली

७) जागतिक दर्जाचा प्रश्न

८) आई नाही म्हणाली…

९) उपवास आहे

१०) लातूरमध्ये…

११) मराठी मुलगा प्रत्येक मुलीला मेसेजमध्ये हेच पाठवतो…

१२) फ्लर्ट करतायत…

१३) मला सूट मिळेल का काही?

१४) मराठी पोराला नोकरीवर ठेवलं

१५) अमेरिका आणि भारत…

१६) मुलांनी काय पाप केलं आहे?

१७) थोडं प्रेम व्यक्त कर म्हटल्यावर…

१८) रिप्लाय आलाय की कळवतो

१९) मुलांना का विचारत नाही?

२०) तिने सोमवार धरलाय…

२१) रिलॅक्स

२२) सर्वात टेक्निकल प्रश्न

२३) मराठी निब्बा

२४) राष्ट्रीय प्रश्न

२५) पोरांचं काय?

स्विगीच्या या प्रश्नामुळे मराठी नेटकऱ्यांचा चांगलाच टाइमपास झाल्याचं चित्र दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 6:08 pm

Web Title: jevlis ka tweets swiggy marathi people goes gaga scsg 91
Next Stories
1 “नाना पटोलेंनी देशाचा GDP मायनस सात केला”; नारायण राणेंचा व्हिडीओ व्हायरल
2 नाद खुळा… पर्यावरण दिनानिमित्त लावली गांजाची झाडं; पोलिसांनी सुरु केला तपास
3 ऐकावे ते नवलच… अदृश्य शिल्प १३ लाखांना विकलं गेलं; शिल्पकार म्हणतो, “कलाकृतीच्या नसण्यातच तिचं अस्तित्व दडलंय”
Just Now!
X