२०१७ हे वर्ष संपत आलं आहे. गेल्यावर्षभरात विविध क्षेत्रात घडलेल्या, चर्चिल्या गेलेल्या वेगवेगळ्या घटनांचा आढावा घेतला जात आहे. यूट्युबनंही वर्षभरात तुफान प्रसिद्ध झालेल्या ‘टॉप १०’ व्हिडिओंची यादी जाहीर केली आहे. या यादीत ‘Until We Will Become Dust’ हा व्हिडिओ २०१७ मधला सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला आहे.

तर भारतात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये ‘मर्सल’ आणि ‘बाहुबली २’ हे दोन चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांवर आहे तो केरळमधल्या ‘इंडियन स्कूल ऑफ कॉमर्स’ या महाविद्यालयातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ. ऑगस्ट महिन्यात यूट्युबवर अपलोड केलेल्या हा व्हिडिओ जवळपास दोन कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ओणमनिमित्त या कॉलेजच्या शिक्षका आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून जिमीक्की कमाल यांच्या एका गाण्यावर सहज गंमत म्हणून डान्स केला होता. पारंपरिक साडी नेसून शिक्षिकांनी जिमीक्कीच्या गाण्यावर ठेका ठरला. मग काय वर्गातल्या इतर मुलांनीही बाकडे वाजवून आपल्या शिक्षिकांना प्रोत्साहन दिलं. हा व्हिडिओ इतका पाहिला जाईल याची तेव्हा कोणीही कल्पनाही केली नव्हती. ‘टॉप ट्रेंडिंग’च्या यादीत दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर या व्हिडिओची पुन्हा एकदा सगळीकडे चर्चा पाहायला मिळत आहे.