जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. प्रत्येक देश आणि नागकरिक या विषाणूचा सामना करत आहे. करोनामुळे बेरोजगारी वाढली आणि अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. त्यामुळे काहींनी टोकाची पावलंही उचलली अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करोनामुळे नोकरी गेलेल्या ब्रिटनमधील एका भारतीय व्यक्तीला लॉटरी लागली असून यामध्ये तो कोट्यधीश झाला आहे.
शिबू पॉल असं त्या भारतीय व्यक्तीचं नाव आहे. ब्रिटनच्या नॉटिंघममध्ये तो राहतो. करोना विषाणूमुळे शिबू पॉल यांची नोकरी गेली मात्र नशिबाने त्यांना या संकटाच्या काळात एक सुखद धक्का देत श्रीमंत केलं आहे.
शिबू यांना कोट्यधीची Lamborghini कारसोबतच १८ लाख रुपयांचं बक्षीसही मिळालं आहे. शिबू हे मुळचे भारतीय असून ते केरळच्या कोच्चीमध्ये ते एका स्टुडिओत साऊंड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वर्षभरापूर्वीच ते ब्रिटनमध्ये शिफ्ट झाले होते. त्यानंतर लगेच करोनामुळे ते बरोजगार झाले.
बेरोजगारीमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यादरम्यान BOTB साठी १८०० रुपयांची तीन तिकिटे खरेदी केली. करोनाच्या संकटात त्यांना नशीबानं साथ दिली. शिबू यांना कोट्यधीची Lamborghini कारसोबतच १८ लाख रुपयांचं बक्षीसही मिळालं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 12:33 pm