इंग्लंडचा नवोदित गोलंदाज जोफ्रा आर्चर हा त्याच्या मैदानावरील खेळाबरोबरच ट्विटसाठीही लोकप्रिय आहे. अनेकदा एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याने केलेले जुने ट्विट व्हायरल होत असतात. त्याचे काही भारतीय चाहते तर मजेत ‘आर्चर ही भगवान है’ असंही म्हणतात. आपल्या ट्विटमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या आर्चरने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि तो ही थेट राज्यातील राजकीय घडामोडींमुळे. अनेकजण आर्चरच्या एका जुन्या ट्विटचा संबंध महाराष्ट्रातील सध्याच्या सत्तास्थापनेच्या चढाओढीशी लावताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळजवळ महिना होत आला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन बिनसल्याने बुहमतानंतरही युतीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झाले नाही. त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हलचाली सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र मागील महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेले चर्चेचे गुऱ्हाळ पाहून नेटकरी अगदीच वैतागले आहेत. अनेकांनी या सत्तास्थापनेवरुन मिम्स व्हायरल केले आहेत तर अनेकांनी राजकारण्यांना कोपरखळ्या लगावल्या आहेत. अशातच आता आर्चरचे २०१४ मधील एक ट्विट आता चर्चेत आले आहेत. या ट्विटवर अनेक नेटकरी रिप्लाय देत असून पाच वर्षांपूर्वीच आर्चरला काय होणार हे ठाऊक असल्याचे म्हटलं आहे.

काय आहे

राज्यामध्ये बहुमत मिळाल्यानंतर चार आठवडे होऊन गेले तरी सत्ता स्थापन झाली नाही. युतीने अंतर्गत वादामुळे सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारे १४४ आमदारांचे बहुमत राज्यपालांसमोर सादर करता आले नाही. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आणि राज्यात राष्ट्रती राजवट लागू झाली. त्यामुळेच बहुमत दिल्यानंतरही राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे अनेकांनी नेटवरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यातच अचानक २५ मे २०१४ रोजी आर्चरने केलेले ट्विट चर्चेत आले. रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी आर्चरने केलेल्या केलेल्या ट्विटमध्ये “मुंबईच्या नशिबात हेच आहे” असं म्हटलं आहे.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर म्हणजेच १२ नोव्हेंबरनंतर या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय करुन ‘तुला हे ही ठाऊक होतं का?’ असा प्रश्न आर्चरला विचारला आहे.

घ्या राजाकराणाबद्दल ठाऊक होतं

मीच देव…

तुला कसं ठाऊक?

ऑक्टोपस बाबाला आठ जन्म घ्यावे लागतील

त्यांच्याबद्दल पण सांग

कधी थांबणार

हे पण समजलेलं का?

अयोध्येबद्दल सांग

सगळ्यासाठी याचं एक ट्विट आहेच

आर्चरच्या या ट्विटचा अनेकांनी राज्यातील राजकारणाशी संबंध लावला असला तरी यामागील खरं कारण आणि हे ट्विट नक्की कशासाठी होतं हे एका वाचकाने ट्विट केलं आहे. हे ट्विट आर्चरने मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर केले होते. या सामन्यामध्ये मुंबईने राजस्थानने दिलेले १९० धावांचे लक्ष्य अवघ्या १४.३ षटकांमध्ये पार केले होते.

आर्चरच्या ट्विटवरुन अशाप्रकारे नेटकऱ्यांनी सैराट होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये भारताने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही आर्चरचे एक जुने ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. या ट्विटमध्ये त्याने “सध्याच्या दिवसांमध्ये ३७० अजिबात सुरक्षित नाही”, असे म्हटले होते. त्याआधी जुलै महिन्यात विश्वचषकाच्या अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या अंतिम सामन्यात इंग्लंड जिंकल्यानंतर सुपर ओव्हर टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरचेच ही ट्विट व्हायरल झालेले. त्याने केलेल्या ट्विटमध्ये ६ चेंडूंत १६ धावा , लॉर्ड्सवर जाण्याची इच्छा, सुपर ओव्हर टाकायलाही आवडेल असे काही ट्विट होते. त्यामुळे नेटकरी जोफ्रा आर्चरला ज्योतिषाचार्य असल्याचे म्हटले होते.