02 December 2020

News Flash

पत्रकार म्हणाला, गौतम गंभीर ‘दहशतवादी’; चाहत्यांनी ट्विटर सोडण्याचा दिला सल्ला

क्रिकेटपटू गौतम गंभीरचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. गंभीरने काही दिवसांपूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्सचं कर्णधारपद सोडलं , त्यानंतर कोलकात्याविरोधात झालेल्या सामन्यात...

गौतम गंभीर (संग्रहीत छायाचित्र)

क्रिकेटपटू गौतम गंभीरचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. गंभीरने काही दिवसांपूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्सचं कर्णधारपद सोडलं , त्यानंतर कोलकात्याविरोधात झालेल्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला. केवळ आयपीएलमुळे गंभीर चर्चेत आहे असं नाही तर पाकिस्तानबाबतच्या आपल्या रोखठोक भूमिकेमुळे तो सातत्याने चर्चेत असतो. पण आता आणखी एका कारणामुळे गंभीर चर्चेत आहे. गौतम गंभीरला एका पत्रकाराने दहशतवादी असं म्हटलंय. एका ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराने गंभीरला ‘व्हर्बल दहशतवादी’ (बोलणारा दहशतवादी) असं म्हटलंय.

ऑस्ट्रेलियाचा पत्रकार डेनिस फ्रीडमॅनने स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन, गोतम गंभीर हा एक ‘व्हर्बल दहशतवादी’ (बोलणारा दहशतवादी) आहे, भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध धोकादायक असू शकतात असं तो पुन्हा म्हणालाय असं ट्विट केलं.

नुकतंच एका इंटरव्ह्यूमध्ये गंभीर म्हणाला होता की, पाकिस्तानसोबत संबंध सुधारायचे असतील तर सगळ्या सेक्टरमध्ये बंदी घालण्यात यावी. संगीत आणि चित्रपटसृष्टीचाही यात समावेश व्हावा. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर फक्त क्रिकेटवर बंदी घालून होणार नाही. जोपर्यंत संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला कोणतीही संधी देता कामा नये, असं गंभीर म्हणाला होता. गंभीरच्या या विधानानंतर फ्रीडमॅनने गंभीरला ‘व्हर्बल दहशतवादी’ असं म्हणत ट्विट केलं.

मात्र, गंभीरविरोधात हे ट्विट करणं फ्रीडमॅनला चांगलंच महागात पडलं आणि गंभीरच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. युजर्सनी ट्विटकरुन फ्रीडमॅनला या मुद्यात नाक खुपसू नको असा सल्ला दिला, तर काही जणांनी त्याला ट्विटर सोडण्यास सांगितलं. यापूर्वीही फ्रीडमॅनने भारताचा कर्णधार विराट कोहलीबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 11:21 am

Web Title: journalist from australia calls gautam gambhir a terrorist and then fans trolled him
Next Stories
1 ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे लक्ष्य!
2 सुमित, निखट, हिमांशू यांना सुवर्ण
3 दिल्लीच्या मार्गात बलाढय़ चेन्नईचा अडथळा
Just Now!
X